Development work is being done as the elections are approaching nashik marathi news 
नाशिक

विकासकामांच्या लगीनघाईमुळे निवडणुकीची चाहूल; जनतेपर्यंत पोचण्याची उमेदवारांची धडपड जोरात

प्रमोद दंडगव्हाळ

सिडको (नाशिक) : एरवी नागरिकांच्या विविध मागण्या, समस्या व विकासकामांसाठी रास्ता रोको करण्यात येत असल्याचे चित्र आपण नेहमीच बघत आलो आहोत; परंतु आता महापालिका निवडणूक जवळ येऊन ठेपल्याने लोकप्रतिनिधींच्या पुढाकाराने सुरू असलेल्या विकासकामांमुळे सिडको परिसरात विकासकामांनीच रास्ता रोको केल्याचे सकारात्मक चित्र बघायला मिळत आहे. 

सिडको परिसरात विद्यमान नगरसेवकांनी विविध नागरी विकासकामांचा धूमधडाका सुरू केल्याने सिडकोतील मुख्य रस्त्यावर ‘सावधान, पुढे काम सुरू आहे’ अशा आशयाचे फलक सध्या ठिकठिकाणी झळकत आहेत. यामुळे महापालिका निवडणूक जवळ आली की म्हणून की काय ही विकासकामे सुरू आहेत, अशी विचारणा सध्या मतदारराजा यानिमित्ताने करू लागल्याचे दिसते आहे. 

अवघ्या दीड वर्षाच्या अंतरावर नाशिक महापालिका निवडणूक जवळ येऊन ठेपली आहे. त्यामुळे आजी-माजी व नवीन उमेदवार हे नगरसेवकपदाच्या निवडणुकीसाठी सज्ज झाल्याचे दिसून येत आहे. याकरिता विविध उपक्रमांच्या माध्यमातून ते सध्या जनतेपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करत आहेत. थोडक्यात काय तर उमेदवारांच्या या निवडणूक फंड्यामुळे मतदारराजाला महापालिका निवडणूक जवळ येऊन ठेपल्याची चाहूल यानिमित्ताने लागल्याचे चित्र बघायला मिळत आहे. 

कॅलेंडर वाटप, हळदी-कुंकू, गेट-टुगेदर, रक्तदान शिबिर, विविध स्पर्धा, बक्षीसवाटप, मतदार नोंदणी, विविध क्रीडा स्पर्धा, साई भंडारा, तीर्थयात्रा, सहल, तसेच सार्वजनिक छोटे-मोठे उद्‌घाटन-भूमिपूजन कार्यक्रम आदी. उत्तमनगर, पवननगर, शिवाजी चौक, त्रिमूर्ती चौक, उपेंद्रनगर, अंबड, चुंचाळे, खुटवडनगर आदी परिसरामध्ये उड्डाणपूल, सेंट्रल पार्क, रस्ते, लाइट, पाण्याची पाइपलाइन, ड्रेनेज आदी विकासकामे सुरू आहेत..  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video : समोरा समोर दोन बसची भयानक टक्कर; अपघाताचा थरारक व्हिडिओ व्हायरल, पाहून शॉक व्हाल..

IND vs ENG 2nd Test : रवींद्र जडेजाने 'तलवार' उपसली! कपिल देव यांचा विक्रम मोडला, Sobers सारख्या दिग्गजांसोबत जाऊन बसला

Latest Maharashtra News Updates : महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडून बाळासाहेब लांडगे यांचं निलंबन

बाबा वेंगाचं भाकीत खरं ठरणार? पुढच्या 6 महिन्यात 'या' 4 राशी करोडपती होणार? कोणत्या त्या राशी जाणून घ्या...

Pune Accident: बसची वाट बघत उभे होते, तेव्हाच टेम्पो काळ बनून आला अन्..., दोघांचा जागीच मृत्यू, घटनेने पुण्यात खळबळ

SCROLL FOR NEXT