Devidas Pingle guiding the attendees at the special general meeting of Nashik Shetki Taluka Sangh  esakal
नाशिक

Nashik News : शेतकी संघाने संस्थापक सदस्यांना दिला न्याय : देवीदास पिंगळे

नाशिक शेतकी तालुका संघाच्या स्थापनेवेळी ज्या संस्थापक सदस्यांनी पंचवीस रुपये प्रत्येकी वर्गणी काढून योगदान देत संस्था उभी केली होती

सकाळ वृत्तसेवा

पंचवटी : नाशिक शेतकी तालुका संघाच्या स्थापनेवेळी ज्या संस्थापक सदस्यांनी पंचवीस रुपये प्रत्येकी वर्गणी काढून योगदान देत संस्था उभी केली होती.

त्यांना मागील संचालक मंडळानी मतदानापासून वंचित ठेवत सभासदपद रद्द केले होते, त्या सदस्यांना पुन्हा सभासदपद बहाल करीत नवनिर्वाचित संचालक मंडळानी न्याय मिळवून दिला.

सभासदांना दिलेला शब्द पाळला गेला, असे प्रतिपादन माजी खासदार तथा बाजार समिती सभापती देविदास पिंगळे यांनी केले. ते नाशिक शेतकी तालुका संघाच्या विशेष सर्वसाधारण सभेत बोलत होते. (Devidas Pingle statement Farmers Sangh gave justice to founding members Nashik News)

या वेळी सभेत नाशिक शेतकी तालुका संघाचे विजयी सभापती दिलीपराव थेटे, उपसभापती दिलीप चव्हाण, शरद गायखे, बबन कांगणे, रावसाहेब कोशिरे, विष्णू थेटे, भिकाजी कांडेकर, शांताराम माळोदे, दीपक हगवणे, आशा गायकर, जयराम ढिकले, वाळू काकड, ढवळू फसाळे, शंकरराव पिंगळे, योगेश रिकामे, तानाजी पिंगळे उपस्थित होते.

बाजार समितीचे संचालक युवराज कोठुळे, राजाराम धनवटे, विलास कड, माजी संचालक विश्वास नागरे, तुकाराम पेखळे, संजय तुंगार, आबासाहेब बर्डे, विलास कड, विलास कांडेकर, भास्कर गोडसे, काळू थेटे, निवृत्ती कांडेकर, किसन कांडेकर, गोकुळ काकड, गणेश कहांडळ, दौलत पाटील, भाऊसाहेब भावले,धनाजी पेखळे, नामदेव गायकर उपस्थित होते.

या वेळी शेतकी तालुका संघाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.त्यानंतर विशेष सर्वसाधारण सभेची सुरवात करून आठ विषयांवर चर्चा करून मंजूर करण्यात आले.

बाजार समिती सभापती देविदास पिंगळे म्हणाले, की मालेगावची संघाची जागा विकण्याऐवजी तशीच ठेवावी, भविष्यात तिची किंमत वाढेल. मागील पंचवार्षिकमध्ये झालेल्या कारभाराचे ऑडिट करा, पुढे होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांपुढे मांडा.

शेतकी तालुका संघ, बाजार समिती, मविप्र यांच्या सर्वच्या सहमतीने मोजणी करून कोणी अतिक्रमण केले असेल ते काढून ती शेतकी तालुका संघाच्या नावावर करू. पंचवीस रुपये भरून ज्या सभासदांनी संस्था उभी केली आहे, त्यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही.

यासाठी विशेष सर्व साधारण सभा घेण्यात आली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तज्ज्ञ संचालक शंकरराव पिंगळे व व्यवस्थापक संदीप थेटे यांनी केले. सभापती दिलीप थेटे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AUS vs IND: भारताच्या फिरकी जाळ्यात अडकले ऑस्ट्रेलियन्स! चौथा T20I जिंकून टीम इंडियाची मालिकेत आघाडी

Ausa News : अतिवृष्टीत सर्वस्व गमावलेल्या शेतकऱ्यांच्या लेकींचा उद्धव ठाकरे यांच्यासमोर टाहो

Dy Chief Minister Attacked: धक्कादायक! आधी निदर्शने, नंतर उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला, बिहारमध्ये नेमकं काय घडलं?

Solapur Crime : बार्शीत दारु पिण्यास पैसे दिले नाहीत म्हणून डोक्यात दारुच्या बाटल्या फोडल्या. दोघांविरोधात गुन्हा दाखल!

IND A vs SA A, Test: रिषभ पंतसमोर 'तडगा' स्पर्धक! दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पठ्ठ्याचं झुंजार शतक, भारताच्या कसोटी संघासाठी ठोकला दावा

SCROLL FOR NEXT