Devotees flock to Saptashrungi Temple due to Chaitrotsava Nashik News esakal
नाशिक

चैत्रोत्सवामुळे गडावर भक्तांची मांदियाळी; सुट्यांमुळे गर्दी वाढणार

दिगंबर पाटोळे

वणी (जि. नाशिक) : आदिमायेचे माहेर असलेल्या खानदेशातून आई भगवतीच्या भेटीसाठी आतूर झालेले हजारो पदयात्रेकरु आदिमायेचा जयघोष करीत सप्तशृंगगडाच्या (Saptashrungi Devi temple) दिशेन मार्गक्रमण करीत आहेत. पदयात्रेचे मुख्य आकर्षण असलेला शिरपूर बॅंडचे मालेगावात आगमन झाले असून हजारो भाविक या बॅंडबरोबर चालत आहेत. दरम्यान आज चैत्रोत्सवातील तिसऱ्या माळेस पन्नास हजारावर भाविकांनी श्री. भगवतीचे दर्शन घेतले.

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठापैकी आद्यस्वयंभू शक्तीपीठ श्री सप्तशृंग निवासिनी देवीचा चैत्रोत्सव श्री रामनवमीपासून भक्तिमय वातावरणात सुरू आहे. पहाटेपासून विविध धार्मिक पूजा-अर्चांसह महावस्त्र व अलंकाराची सवाद्य मिरवणूक काढण्यात येत आहे. चोख सुरक्षा व्यवस्था व सेवासुविधेसह माध्यमातून देवस्थान कर्मचारी व प्रशासकीय विभागातील अधिकारी व कर्मचारी यात्रोत्सव यशस्वीतेसाठी कार्यरत आहेत. यात्रा सुरळीत पार पडण्यासाठी स्वयंसेवी संघटनांनी हातभार लावलेला आहे.

आज कामदा एकादशी व मंगळवार हा देवीचा वार समजला जात असल्याने पहाटेपासूनच भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती. सकाळची पंचामृत महापूजा नाशिक जिल्हा परिषदेच्या (ZP) मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लीना बनसोड यांच्या हस्ते करण्यात आली. संस्थानचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, कार्यालयीन अधीक्षक प्रकाश जोशी, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे, मंदिर प्रमुख नारद अहिरे, सुनील कासार, सुरक्षा प्रमुख यशवंत देशमुख, ग्रामपंचायत सदस्य संदीप बेनके, राजेश गवळी, शांताराम सदगीर यांसह सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

दोन वेळेला मोफत अन्नदान

यात्रा उत्सव दरम्यान दोनवेळचे मोफत अन्नदान (महाप्रसाद) सुविधा चैत्रोत्सव कालावधीत सुरु असून येणाऱ्या भाविक भक्तांच्या सेवा-सुविधेसाठी २४ तास मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आलेले आहे. उत्सव काळात भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये यासाठी संस्थान मार्फत २ टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

खानदेशातील पदयात्रा मालेगाव, पिंपळगावपर्यत

खर्ची (ता. एरंडोल, जि. जळगाव) हे आदिमाया सप्तशृंगीचे माहेर असल्याचे खानदेशातील भाविक मानतात. तसा उल्लेख पुराणातही असल्याने चैत्रोत्सव वारीसाठी दरवर्षी खानदेशातून शेकडो दिंड्या गडावर येतात. तीन वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर खंडित झालेल्या चैत्रवारीसाठी, सप्तशृंगीच्या भेटीसाठी खानदेशातून शेकडो दिंड्या तळपत्या उन्हाची पर्वा न करता मजल दरमजल करीत आदिमायेची गीते डिजेच्या तालावर गात व देवीचा जयघोष करीत मालेगाव, पिंपळनेरपर्यंत दाखल दाखल झाल्या आहेत. १४ व १५ एप्रिलला सलग दोन दिवस शासकीय सुटी असल्याने गुरुवारपासून पुढील चारही दिवस गडावर भाविकांची मोठी गर्दी होणार असल्याने त्यादृष्यीने ट्रस्ट, ग्रामपंचायत, प्रशासकीय यंत्रणा, राज्य परिवहन महामंडळ यांनी नियोजन केले आहे.

"सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट अंतर्गत धार्मिक पूजा अर्चा, मंदिर परिसरातील स्वच्छता, भाविकांच्या सेवासुविधांचे निटनेटके नियोजन आदी सर्वांचे अतिशय उत्कृष्ट व्यवस्थापन करण्यात आले आहे. आगामी काळात ट्रस्टचे विश्वस्त मंडळ व प्रशासनाने अधिक उत्कृष्ट पद्धतीने भाविकांच्या सेवा-सुविधा उभाराणीसाठी होणाऱ्या प्रयत्नांना शुभेच्छा."

- श्रीमती लीना बनसोड, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. नाशिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

What is Rudali Tradition? : देवेंद्र फडणवीसांकडून उद्धव ठाकरेंना 'रुदाली'ची उपमा; पण रुदाली म्हणजे कोण? काय आहे ही विचित्र परंपरा?

Thane News: शिवशाहीची धोकादायक अवस्था, व्हायरल व्हिडीओनंतर प्रशासनाला जाग, अधिकाऱ्यांची सारवासारव

Adani Group Investment : दिवाळखोरीतून जाणाऱ्या ‘या’ कंपनीवर अदानी ग्रुप तब्बल १२५००००००००००० रुपये लावण्यास तयार!

Dhule News : धुळे जिल्हा बँकेचा 'कमाल': पीककर्ज वाटपात उद्दिष्ट ओलांडले, राष्ट्रीयीकृत बँका पिछाडीवर

Vaibhav Suryavanshi इंग्लंडमध्ये कसोटी सामना पाहून भारावला, गिलबद्दलही बोलला; लक्ष्मणमुळे U19 टीम इंडियाला मिळाला स्पेशल अनुभव

SCROLL FOR NEXT