godaghat news esakal
नाशिक

गोदाघाटावर भाविकांभोवती रिक्षाचालकांचा अक्षरश: गराडा

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : श्री रामचंद्र यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी, धार्मिकस्थळ, त्र्यंबकेश्‍वर येथील ज्योर्तिलिंग, सप्तशृंगगड यामुळे नाशिकमध्ये वर्षभर भाविकांचा राबता असतो. याच भाविकांच्या पर्यटनावर गोदाघाटावरील अनेकांचा उदरनिर्वाह व व्यवसाय चालतो. शहराच्या अर्थकारणाला बळकटीही मिळते.

मात्र, असे असताना दररोज शेकडोंच्या संख्येने येणाऱ्या भाविकांसाठी शहरातील धार्मिक स्थळांना भेट देण्यासाठी त्यांना हक्काचे वाहन नाही. त्यामुळे रिक्षाचालकांकडून या भाविकांची अव्वाच्या सव्वा दराने लुट होते. महापालिका वा पर्यटन विभागाकडून कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे भाविकांची नाशिकमधील तीर्थाटनाची वाटच बिकट असल्याची वस्तुस्थिती आहे. (Devotees were looted at Godaghat by rikshaw drivers latest marathi news)

नाशिक शहर देशभरात नव्हे तर, जगभरात धार्मिकस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. तसेच, दर बारा वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा भरतो. कोट्यवधी भाविक शहरात दाखल होतात. असे असतानाही भाविकांना धार्मिक स्थळांसह पर्यटनस्थळी भ्रमण करून आणणारे वाहन नाही.

त्यामुळे भाविकांना खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागते. परिणामी, या रिक्षाचालकांकडून भाविकांची आर्थिक लुट होते. गोदाघाटावर परराज्यातील खासगी ट्रॅव्हल्स दाखल होताच, त्या वाहनाभोवती गोदाघाटावर आधीच भाविकांच्या प्रतिक्षेत थांबलेल्या रिक्षाचालकांचा गराडा पडतो.

भाविकांना पंचवटी व तपोवनातील धार्मिकस्थळांचे दर्शन घडवून आणण्यासाठी रिक्षाचालकांमध्ये चढाओढ सुरू होते. अव्वाचे सव्वा भाडे आकारून भाविकांना तपोवनात नेले जाते. त्यानंतर काळाराम मंदिर, सीतागुंफा, कपालेश्‍वर, रामकुंडावर ट्रीपचा समारोप केला जातो. येणाऱ्या भाविकांना शहराची माहिती नसते. त्यामुळे गोदाघाटावर भाविकांच्या शोधार्थ थांबलेले रिक्षाचालक या भाविकांभोवती गराडा घालतात.

माहिती नसल्याने गैरफायदा

गोदाघाट परिसरातील कपालेश्‍वर, काळाराम मंदिर, सिता गुंफा, तपोवन, भक्तिधाम आदी या धार्मिक स्थळांना नेऊन परत गोदाघाटावर सोडण्यासाठी अडीच ते तीन हजार रुपये आकारतात. परगावचे असल्याने भाविकांसमोर दुसरा कोणताही मार्ग राहत नाही.

रिक्षाचालक कमी-जास्त भाडे आकारून भाविकांची आर्थिक लुट करतात. काही भाविक हे रेल्वे, बसने दाखल होतात. बसस्थानकातून गोदाघाटावर भाविकाला यायचे असेल तर रिक्षाचालकांकडून अव्वाच्या सव्वा भाडे आकारले जाते. भाविकांना पुरेशी माहिती नसल्याने त्याचा गैरफायदा रिक्षाचालकांकडून होतो.

नाशिकमधील धार्मिकस्थळे

रामकुंड, श्री कपालेश्‍वर मंदिर, कार्तिक स्वामी मंदिर, काळाराम मंदिर, काट्या मारुती मंदिर, लक्ष्मणरेखा मंदिर, गोरेराम मंदिर, सितागुंफा व पाच वडाची झाडे, भक्तिधाम व वेदशास्त्र पाठशाला, कपिला-गोदावरी संगम, नारोशंकर मंदिर, सांडव्यावरचे देवी मंदिर, पर्णकुटी, लक्ष्मी नारायण मंदिर, लक्ष्मण मंदिर, तपोवन गंगाघाट,

"श्रावण महिना असल्याने देवदर्शन करण्यासाठी मध्यप्रदेशातून सहकुटुंब आलो आहोत. पंचवटीतील देवदर्शनासाठी रिक्षाचालकांशिवाय दुसरी व्यवस्था नाही. भाविकांसाठी महापालिकेने भाविकांसाठी स्वतंत्र व्यवस्था करायला पाहिजे. रिक्षाचालकांसाठी देवदर्शनासाठीचे निश्‍चित दर ठरवून दिले पाहिजे." - बाबूलाल शुक्ला, (मध्य प्रदेश) भाविक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Airport Incident: बायकोशी भांडण झालं अन् तरुणाने थेट हवाई दलाच्या भिंतीवरून उडी मारली; पुढे जे घडलं ते धक्कादायक होतं!

Gold Rate Today : सोनं-चांदीची चमक कायम! खरेदी करण्याआधी जाणून घ्या आजचा भाव

माजी BMC आयुक्तांची निवृत्तीनंतर राज्यमंत्री दर्जाच्या पदी नियुक्ती, IAS इकबाल सिंह चहल यांच्याकडे सोपवली मोठी जबाबदारी

Stock Market Today : बजेटपूर्वी शेअर बाजारात मोठी घसरण! मात्र तिमाही निकालामुळे या शेअरमध्ये तेजी; कोणते शेअर्स घसरले?

Latest Marathi News Live Update : आदिवासी शेतकऱ्यांच्या लाल वादळाच्या लाँग मार्चवर तोडग्यासाठी हालचाली

SCROLL FOR NEXT