DGP Sanjay Pandey visited the house and congratulated the police constable couple  
नाशिक

पोलिस महासंचालक पांडे पोहचले शिपायी दाम्पत्याच्या घरी; अन् मग पुढे..

महेंद्र महाजन

नाशिक : वेळ सायंकाळची…स्थळ, नाशिकमधील पोलिस कवायत मैदानासमोरील स्नेहबंधन पार्क. राज्याचे पोलिस महासंचालक संजय पांडे (DGP Sanjay Pandey) यांनी शहर पोलिस दलातील शिपाई गौरव आणि प्रियंका देशमुख या दामप्त्याच्या निवासस्थानी भेट दिली. काळजी घ्या! आनंदात रहा! अशा शब्दांमध्ये पांडे यांनी दोघांना शुभेच्छा दिल्या. वडीलकीच्या नात्याने साहेबांनी दाखवलेला जिव्हाळा शब्दांमध्ये वर्णन करण्यासारखा नाही, अशा भावना गौरव यांनी व्यक्त केल्यात.

गौरव हे मूळचे सिन्नरचे. ते २०१७ मध्ये पोलिस दलात दाखल झाले. पत्नी प्रियंका या २०१३ मध्ये पोलिस झाल्या. गौरव हे नाशिक पोलिस आयुक्तालयाच्या सेवेत आहेत. प्रियंका यांची बदली ठाणे ग्रामीण मधून नाशिक शहरमध्ये झाली. पण पत्नीला नाशिकला येता येत नव्हते. त्यामुळे गौरव यांनी पती-पत्नी एकत्रीकरणासाठी मदत व्हावी अशी विनंती पांडे यांची भेट घेऊन केली होती. त्यानंतर प्रियंका यांची बदली नाशिकमध्ये झाली. मग गौरव यांनी पांडे यांना नाशिकला आलात, की घरी या, अशी विनंती केली होती. पांडे हे नाशिकच्या दौऱ्यावर असताना गौरव यांनी त्यांना संसाराला भेट द्यावी असा मेसेज पाठवला. कार्यालयीन कामकाजामुळे पांडे यांच्याकडून होकार मिळाला नाही…

अन् साहेब घरी पोचले..

मेसेज केल्याच्या दिवशी सायंकाळी ‘गौरव कुठं आहेस?‘ असा विचारणा करणारा फोन केला आणि घरी येतोय असा निरोप साहेबांनी दिला. फोन सुरु असताना पाहतो काय? साहेब घरी पोचले, असे सांगून गौरव म्हणाले, की घरात येताना रांगोळीच्या पलिकडच्या बाजूला साहेबांनी बूट काढले. घरात आल्यावर साध्या सोफ्यावर साहेब बसले. छान राहता, चांगलं झालं, चांगला संसार फुलला अशी कौतुकाची थाप साहेबांनी आम्हा दोघांना दिली. पाणी, दूध घेतले. आमच्या दोघांसमवेत साहेबांनी आनंदाने छायाचित्र, सेल्फी घेण्यास परवानगी दिली. एकुणच साहेबांची भेट म्हणजे, आम्हा दोघांसाठी दसरा-दिवाळी सणासारखी राहिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याचे भाव कोसळले; महिन्याभरात 23,000 रुपयांनी स्वस्त आणि आज तर तब्बल... खरेदीआधी जाणून घ्या ताजा भाव

Amit Shah Kolhapur Visit : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज रात्री कोल्हापुरात दाखल होणार; अंबाबाई मंदिराबाबत मोठा निर्णय, पाहा मिनिट-टू-मिनिट कार्यक्रम

Latest Marathi News Live Update : पंढरपूर कॉरिडॉरच्या कामाला प्रशासकीय मान्यता; 3 993 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद

Mumbai BEST Bus Strike : मुंबईत बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप; रिक्षा चालकांकडून प्रवाशांची लूट, प्रवाशांमध्ये संताप

Lote MIDC Water Crisis : कोकणातील उद्योगांवर 40 वर्षांत प्रथमच मोठं संकट! 15 जूनपासून एमआयडीसीचे पंपिंग स्टेशन बंद; पुढील दोन दिवसांत सर्व कंपन्या कुलूप लावणार

SCROLL FOR NEXT