Nima President Dhananjay Bele felicitating Saket Chaturvedi, the new CEO of HAL. Neighbor officials.  esakal
नाशिक

Nashik News : सुट्या भागांचे काम स्थानिक उद्योजकांना द्या : धनंजय बेळे

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : नाशिकच्या एचएएल (HAL) कारखान्यास लाइट कॉमबॅक्ट एअरक्राफ्टच्या निर्मितीची मिळालेली ऑर्डर नाशिकला वेगळ्या उंचीवर नेणारी आहे. (Dhananjay Bele statement about Give vacant parts to local entrepreneurs nashik news)

नाशिकच्या उद्योजकांना त्याद्वारे सुटेभाग बनविण्याचे काम स्थानिक उद्योजकांना मिळावे असे झाल्यास नाशिकच्या उद्योजकांचीही देश विकासाच्या कार्यात हातभार लागेल, असे मत निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी केले.

एचएएल कारखान्यास गेल्या महिन्यात आठ हजार ८०० कोटी रुपयांच्या ट्रेनर विमानांच्या निर्मितीची ऑर्डर मिळाली आणि आता लाइट कॉमबॅक्ट एअरक्राफ्ट निर्मितीची ऑर्डर मिळाली आहे. यासंदर्भात निमाच्या पदाधिकाऱ्यांनी एचएएलचे नूतन सीईओ साकेत चतुर्वेदी यांची भेट घेत सत्कार केला.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

श्री. चतुर्वेदी यांनी एचएएललाच्या सुट्या भागांचे निमाच्या सहकार्याने लवकरच प्रदर्शन भरविण्यात येईल, असे चतुर्वेदी म्हणाले. तसेच, सुट्या भागांच्या निर्मितीचे काम नाशिकच्या उद्योजकांना देण्याबाबतच्या निमाच्या मागणीचा विचार करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

श्री. बेळे म्हणाले, नाशिकला डिफेन्स हब बनविण्याच्या हालचाली सुरू झाल्याने इंडिनायझेशनमध्ये नाशिकच्या उद्योजकांना सहभागी करून घ्यावे, येथील उद्योग व्यवसाय अधिक वृद्धिंगत होण्यास चालना मिळावी असेही श्री. बेळे यांनी नमूद केले. या वेळी निमाचे उपाध्यक्ष आशिष नहार, कोशाध्यक्ष विरल ठक्कर, पॉवर एक्झिबिशनचे अध्यक्ष मिलिंद राजपूत, राजू वडनेरे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan statement: 'ऑपरेशन सिंदूर'च्या पहिल्याच दिवशी झाला होता भारताचा पराभव - पृथ्वीराज चव्हाणांचं विधान!

IPL 2026 All Teams: ग्रीन सर्वात महागडा खेळाडू, तर अनकॅप्ड खेळाडूंही मलामाल; लिलावानंतर पाहा सर्व संघांतील खेळाडूंची यादी

IPL 2026 Auction Live: जाता जाता Prithvi Shawला दिलासा! एका फ्रँचायझीला आली दया... घेतलं एकदाचं संघात, बघा कोणाकडून खेळणार

PL 2026 Auction : पप्पू यादव यांचा मुलगा आयपीएलमध्ये खेळणार; लिलावात मोजली तगडी रक्कम, जाणून घ्या कोणत्या संघाची झाली कृपा

मोठी बातमी! सिडनीतील दहशतवादी हल्ल्याचं भारतीय कनेक्शन उघड; तेलंगणा पोलिसांनी केली पुष्टी...

SCROLL FOR NEXT