Poster of Gulabo Sapera esakal
नाशिक

ॲनिमेशनच्या जगातला वेगळा प्रयोग - गुलाबो सपेरा

प्रतीक जोशी

नाशिक : ॲनिमेशन (Animation) म्हणजे आपल्या डोळ्यांपुढे उभे राहतात कार्टून (Cartoon). जे सतत आपल्याला हसवणार, मनोरंजन (Entertainment) करणारे असते. आता मात्र ॲनिमेशनमध्ये केवळ मनोरंजन नसून अनेक प्रकारचे चित्रपट, माहितीपट आपल्याला समाज माध्यमावर पाहावयास मिळतात. याच ग्राफिक्स (Graphics) ॲनिमेशनचा वापर करत सटाणा तालुक्यातील अवलियाने समाजातील एका ज्वलंत विषयावर बायोपिक (Biopic) तयार केला आहे. गुलाबो सपेरा असे या ग्राफिक ॲनिमेटेड लघुपटाचे नाव असून, लवकरच हा एक आगळावेगळा प्रयोग असलेला लघुपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. (different experiment in world of animation Gulabo Sapera Nashik News)

ॲनिमेटर चित्रकार प्रा. राजेंद्र वसंत खैरनार, प्रा. केतन मधुकर देवरे यांनी या लघुपटाचे दिग्दर्शन तथा निर्मिती केली आहे. या लघुपटाविषयी ते सांगतात, हा लघुपट स्त्री भ्रूण हत्या, स्त्री सशक्तीकरण या विषयावर आधारित आहे. राजस्थानमधील एका भटक्या स्त्रीची जन्मापासून ते आतापर्यंतच्या आयुष्याची सत्य संघर्ष कथा आहे. एक स्त्री जी भटकी, अशिक्षित आहे, तिने मृत्यूशी कसा संघर्ष केल्याचा प्रवास प्रेक्षकांना पाहावयास मिळेल. स्थानिक कलाकारांच्या सहभागातून नाशिकमध्येच बनलेला हा ग्राफिक्स आणि ॲनिमेशनचा संगम असणारा लघुपट आहे. कथेला न्याय देण्यासाठी वास्तववादी दिसणारे पात्र आणि अनुभव विकसित केले असून, गंभीर विषय सांगण्यासाठी ॲनिमेशन या माध्यमाचा प्रभावीपणे वापर यात केला आहे.

हा लघुपट हॅण्ड मेड आणि डिजिटल ड्रॉइंग सोबतच पेंटिंग टेक्निकच्या मदतीने बनविला गेला आहे. ज्यामध्ये २ गाण्यांचा समावेश आहे. प्रत्येक वयोगटासाठी हा चित्रपट बनविला गेला आहे असेही निर्माते- दिग्दर्शक प्रा. खैरनार सांगतात. या चित्रपटाला पद्मश्री गुलाबो सपेरा, इला अरुण, रूपाली मायाचार्य सूर्यवंशी, तेजस सुगंधी, मयूर भगत, रोहित शेवकर, उत्कर्ष वाघ, हर्षल खैरनार, समृद्धी कुलकर्णी, श्वेता मुळे, निखिल जाधव, निलम चौधरी, गायत्री टीभे, आतिश खैरनार, अखिलेश पाटील यांचे सहकार्य लाभले आहे. दिविशा देवरे, प्रज्ञा पवार, मायरा खैरनार, संगीता खैरनार, पूनम खैरनार, प्रेम खैरनार, ओमकर सानप, अमित खंदारे, स्वप्नील गांगुर्डे, जिजाबाई खैरनार, गायत्री खैरनार, निलम चौधरी, अर्शा पिल्लई, संगीत दिग्दर्शक आदित्य मतकर हे लघुपटातील कलाकार आहेत.

"आम्ही भारतातील पहिली ग्राफिक्स ॲनिमेशन बायोपिक शॉर्ट फिल्म करत आहोत. या चित्रपटासाठी आम्ही इतर कोणतेही आर्थिक पाठबळ घेतले नाही. आम्ही आमच्या मासिक पगारावर आणि काही बचतीसह हा लघुपट पूर्ण केला आहे."
- प्रा. राजेंद्र वसंत खैरनार, निर्माता- दिग्दर्शक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT