damage road  esakal
नाशिक

Nashik: पावसाळा संपल्यानंतरच रस्ते खोदण्यासाठी परवानगी; फोडताना आढळल्यास गुन्हा दाखल करण्याच्या सूचना

सकाळ वृत्तसेवा

Nashik : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध खासगी कंपन्यांना रस्ते फोडण्यासाठी दिलेली मुदत संपुष्टात आली असून, बांधकाम विभागाने नव्याने केलेली मागणी फेटाळून लावली आहे.

त्यामुळे आता यापुढे पावसाळा संपल्यानंतरच कंपन्यांना रस्ते खोदण्यासाठी परवानगी मिळणार आहे जर रस्ता फोडताना आढळल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. (Digging roads allowed only after monsoon Instructions to file case if found breaking Nashik news)

गेला काही वर्षात शहरात जवळपास बाराशे कोटी रुपयांचे रस्ते तयार करण्यात आले. मात्र रस्ते तयार होत असताना दुसरीकडे फोडण्याचेदेखील काम झाले. महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनी लिमिटेड, बीएसएनएल, तसेच खासगी कंपन्यांच्या माध्यमातून फायबर ऑप्टिकल केबल टाकण्यासाठी मोठ्या प्रमाणात रस्ते खोदण्यात आले.

एमएनजीएल अर्थात महानगर गॅस लिमिटेड कंपनीमार्फत सध्या जवळपास 187 किलोमीटरचे रस्ते खोदण्यात आले आहे. या रस्ते खोदकामामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांना त्रास होत असून, अनेक ठिकाणी अपघात होण्याचे प्रकारदेखील घडत आहे.

वीजपुरवठा, पाणीपुरवठा खंडित होणे यासारख्या प्रकारामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. मागील वर्षी पावसाळ्यातच रस्ते खोदाई काम केल्याने त्यातून मोठ्या प्रमाणात अपघात झाले होते. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून खड्डे खोदण्यासाठी अल्टिमेटम देण्यात आला होता.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

10 मेस रस्ते फोडण्यासंदर्भात दिलेली मुदतवाढ संपुष्टात आली. महानगर गॅस लिमिटेड कंपनीने मुदतवाढ देण्याची मागणी बांधकाम विभागाकडे केली. परंतु सदर मागणी लावत गुरुवार (ता. ११) पासून शहरातील रस्ते फोडण्यास व रस्त्यांवर काम करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

रस्ता फोडण्याचे आढळून आल्यास महापालिका कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे तर थेट फौजदारी गुन्हादेखील दाखल करण्याचा इशारा शहर अभियंता शिवकुमार वंजारी यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : मुंबईत दुसऱ्या दिवशीही मुसळधार पाऊस सुरुच, रायगड, पालघरमध्ये शाळांना सुट्टी; रेल अलर्ट जारी, पुढील ४ दिवस धोक्याचे

पोलिस उपायुक्तांचे आदेश! ट्रॅफिक पोलिस नेमलेल्या ठिकाणीच असणे बंधनकारक; ‘HSRP’ नंबरप्लेट नसलेल्या वाहनांवर ‘आरटीओ’ करणार कारवाई; रिक्षा चालकांना ड्रेसकोडचे बंधन

चोरीचे दागिने घेणारा सराफही आरोपी! पावतीशिवाय दागिने घेतल्यास पोलिसांकडून कारवाई; ‘या’ कलमाखाली 3 वर्षांपर्यंत कारावास अन्‌ दंडाची शिक्षा, वाचा...

जिल्हा परिषदेच्या भन्नाट योजना! महिलांना शिलाई मशीन, पिठाची गिरणी; सातवी ते बारावीतील मुलींना सायकली, टॅली, MS-CIT, कराटे प्रशिक्षण, गरीब मुलांना पैसेही

Best Banana French Toast: बिझी मॉर्निंगसाठी बेस्ट! 10 मिनिटांत बनवा बनाना फ्रेंच टोस्ट; लिहून घ्या सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT