Air Service from Ozar Airport latest marathi news esakal
नाशिक

नाशिकहून गोवा व बेंगळुरुसाठी थेट विमानसेवा

विक्रांत मते

नाशिक : गेल्या अनेक वर्षांपासून नाशिककर वाट पाहत असलेल्या गोवा व बेंगळुरू या माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडीवर असलेल्या शहरांशी हवाईसेवेने (Air Service) जोडले जाणार आहे. स्पाइस जेट (Spice Jet) कंपनीच्या वतीने सप्टेंबर व ऑक्टोबर या सीझनमध्ये ओझर विमानतळावरून दररोज सेवा राहणार आहे. (Direct flights from Nashik to Goa Bangalore Nashik latest marathi news)

केंद्र सरकारच्या उडान योजनेंतर्गत ओझर विमानतळावरून सध्या अहमदाबाद- पुणे- हैदराबाद दिल्ली या महत्त्वाच्या शहरांमध्ये हवाई सेवा सुरू आहे आता २५ सप्टेंबर ते १९ ऑक्टोबर या सीझनमध्ये गोवा व बेंगळुरुसाठी हवाई सेवा सुरू होत आहे.

दुपारी साडेबारा वाजता बेंगळुरु होऊन विमानाचे उड्डाण होईल दुपारी दोन वाजून ३५ मिनिटांनी ओझर तळावर विमान उतरेल. त्यानंतर दोन वाजून पंचावन्न मिनिटांनी विमानाचे उड्डाण होईल तीन वाजून ५५ मिनिटांनी गोव्याला पोहचेल.

गोव्याहून साडेपाच वाजता विमानाचे नाशिकसाठी उड्डाण होईल. संध्याकाळी सहा वाजून ३५ मिनिटांनी ओझर विमानतळावर आगमन होईल सहा वाजून ५५ मिनिटांनी पुन्हा बेंगळुरुसाठी विमानाचे उड्डाण होईल. दोन महिन्यांसाठी विमानसेवा असली तरी स्पाइस जेट कंपनीच्या वतीने ऑक्टोबरनंतर विंटर सिझनचे नियोजन केले जाणार आहे.

गोवा व बेंगळुरुसाठी निरंतर सेवा सुरू राहील. गोवा व बेंगळुरु हे दोन्ही शहरे माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यवसायासाठी प्रसिद्ध आहे, नाशिकमध्ये आयटी उद्योग यावे, यासाठी विविध संस्था व व कंपन्या इच्छुक आहे. या दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणारी हवाई सेवा सुरू झाल्यानंतर आयटी उद्योगाला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

"नाशिकच्या आयटी उद्योगाला चालना मिळण्यासाठी गोवा व बेंगळुरू हवाई सेवा सुरू होणे गरजेचे होते. त्यानुसार आता सेवा सुरू होत आहे. माहिती व तंत्रज्ञान क्षेत्राबरोबर शैक्षणिक क्षेत्रात देखील नाशिकची प्रगती या निमित्ताने होईल."

- मनीष रावल, अध्यक्ष, आयमा एव्हिएशन कमिटी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राष्ट्रपतींचे माजी ADC मेजर ऋषभ सिंह संब्याल यांनी घेतली ३०व्या वर्षी निवृत्ती; १२ वर्षांच्या सेवेनंतर किती पेन्शन मिळणार?

ZIM vs AUS : सचिन तेंडुलकरचा 'तो' विक्रम, आता त्याचा राहीला नाही! झिम्बाब्वेच्या ब्रेंडन टेलरचा वन डे क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम

US Student Visa Update: भारतीय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांच्या चार वर्षांच्या व्हिसा नियमांना स्थगिती

Pakistan Cricket : पाकिस्तानात शाहिद आफ्रिदीच्या नावावरून पसरलीय अफवा; नेमकं काय घडलं?

कोकणात मध्यरात्री बाप्पाची ‘चोरी’ होते? दारात गणपती ठेवून फटाके फोडण्यामागचं कारण ऐकून व्हाल भावूक!

SCROLL FOR NEXT