Eknath Shinde
Eknath Shinde 
नाशिक

Eknath Shinde: "तुम्ही पंचनामे झाल्यावर मदत देणार म्हणता, पण..." ; एकनाथ शिंदेंना शेतकऱ्यांसमोर थेट प्रश्न

Sandip Kapde

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नाशिक जिह्यात अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. अयोध्या दौऱ्यावरुन आल्यानंतर एकनाथ शिंदे थेट नाशिक दौऱ्यावर गेले. रविवारी सायंकाळपासून राज्यातील बहुतांश ठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालं आहे . शेतकऱ्यांना तात्काळ मदतीची अपेक्षा आहे.

एकनाथ शिंदे म्हणाले, शेतकऱ्यांना मदत करण्याची गरज आहे. मुख्य सचिवांना व राज्यातील सर्व जिल्हाधीकाऱ्यांना मी सुचना केल्या आहेत. युद्धपातळीवर पंचनामे सुरू झाले. सर्व पालकमंत्र्यांना नुकसानीचे पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत. पंचनामे झाल्यावर नुकसान भरपाई देण्यात येईल.

शेतकऱ्यांचे सरकार आहे. यापूर्वी देखील आम्ही शेतकऱ्यांना आम्ही वाऱ्यावर सोडले नाही. NDRF नियमांच्या दुप्पटीने आम्ही शेतकऱ्यांमा मदत केली. शेतकऱ्यांना ३५० रुपये कांद्याचे अनुदान देखील आम्ही शेतकऱ्यांना दिले आहे. शेतकरी वाचला पाहीजे, शेतकऱ्याला आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही, असे शिंदे म्हणाले.

अनेक शेतकऱ्यांना सप्टेंबर-ऑगस्टमध्ये झालेल्या पावसाची अद्याप मदती मिळाली नाही. आता पंचनामे करुन कधी मदत मिळणार, असा प्रश्न एकनाथ शिंदे यांना करण्यात आला. यावर शिंदे म्हणाले, जे पंचनामे झाले. त्या शेतकऱ्यांना मदत मिळेल. आज सकाळी मागच्या एक-दोन महिन्यात १७७ कोटींच्या नुकसानीचे पैसे द्यायचे देखील मी सांगितले आहे. याबाबत जीआर काढण्याचे आदेश दिले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Swati Maliwal Assault Case : केजरीवालांच्या निवासस्थानातून पोलिसांनी CCTV DVR केलं जप्त; पुरावे गोळा करुन टीम रवाना

Video: राहुल गांधी-अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ, दोन्ही नेत्यांना भाषण न करताच निघावं लागलं

Janhvi Kapoor : "लहान असताना अश्लील साईटवर माझे फोटो..."; जान्हवीने शेअर केला बालपणीचा 'तो' वाईट अनुभव

Rohit Sharma : खासगी संभाषण उघड करणाऱ्या आयपीएल ब्रॉडकास्टरवर रोहितनं काढला जाळ

SRH vs PBKS Live Score : पंजाबची दमदार सुरूवात; तायडे अन् प्रभसिमरनची 96 धावांची सलामी

SCROLL FOR NEXT