Department of Social Justice esakal
नाशिक

Nashik : विद्यार्थ्यांच्या खात्यावर वस्तूंचे पैसे; सामाजिक न्याय विभागाचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : सामाजिक न्याय विभागातंर्गतच्या सरकारी वसतिगृह आणि निवासी शाळेतील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या वस्तूंचे पैसे विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर थेट जमा करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यासाठी चार कोटी २९ लाख ७० हजार ७०५ रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. (directly deposit money for goods given to students of government hostels and residential schools under Department of Social Justice Nashik news)

विद्यार्थ्यांनी पादत्राणे, शालेय गणवेश, शारीरिक शिक्षण गणवेश, रेनकोट स्वतः खरेदी करायचे आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा केले जाणार आहेत. १६ हजार ५०३ पादत्राणे, २४ हजार २३८ शालेय गणवेश, १५ हजार ३१४ शारीरिक शिक्षण गणवेश, दोन हजार ७५२ रेनकोट विद्यार्थ्यांना मिळणार आहेत. सरकारी वसतिगृह, निवासी शाळेत विद्यार्थी उपस्थित झाल्यावर पहिल्या हप्त्यात एकूण रकमेच्या ६० टक्के रक्कम बँक खात्यात जमा केली जाईल. वस्तू खरेदी केल्यावर उर्वरित ४० टक्के रक्कम बँक खात्यात जमा होईल.

राज्यस्तरीय खरेदी समिती

सामाजिक न्याय विभागातंर्गतच्या राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या सरकारी वसतिगृह आणि अनुसूचित जाती व नवबौद्ध मुला-मुलींसाठी सरकारी निवासी शाळा सुरू आहेत. मागासवर्गीय शैक्षणिक संस्थांना सोयी-सुविधा पुरवण्यात होत असलेल्या विलंबावर उपाय म्हणून राज्यस्तरीय प्रशासकीय विभाग खरेदी समिती स्थापन करण्यात आली आहे.

वसतिगृह आणि निवासी शाळांसाठीच्या सोयी-सुविधा खरेदीसाठी ई-निविदा प्रक्रिया राबवून प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी राज्यस्तरीय समितीकडे पाठवण्यात येईल. सामाजिक न्यायचे अपर मुख्य, प्रधान तथा सचिव या समितीचे अध्यक्ष असतील. सह तथा उपसचिव समितीचे सचिव असतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena Political News : सचिन अहिर यांच्यानंतर ठाकरेंचा आणखी एक विश्वासू शिलेदार शिंदे गटात? सरनाईकांसोबत फोटोमुळे चर्चेला उधाण

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

ज्यांच्या नृत्याने महाराष्ट्र डोलला, त्यांच्याच पदरी लग्नानंतर आला इतका त्रास, विठाबाई नारायणगावकर यांची न ऐकलेली कहाणी

July 2026 Calendar: आषाढी एकादशी, जगन्नाथ यात्रा ते गुरु पौर्णिमा; जाणून घ्या जुलै महिन्यातल्या सण-उत्सवांची यादी

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये शेतीच्या वादातून तलवारीचा हल्ला; काकाची बोटं छाटली, चुलत भावावरही वार

SCROLL FOR NEXT