NAB Secretary Mukteshwar Munshettywar and dignitaries while felicitating Divyang Ishwari Pandey who made history by completing the distance from Dharamtar to Gateway of India in four hours. esakal
नाशिक

Nashik News : दिव्यांग जलतरणपटू ईश्वरीने घडविला प्रेरणादायी इतिहास; ‘नॅब’ कडून गौरव

मनाशी प्रत्येकाने स्वप्न पाहिले पाहिजे ते स्वप्न प्रत्यक्षात साकारण्यासाठी जिद्द व परिश्रम समर्पित करत चिकाटी बाळगल्यास यशाचे शिखर गाठता येते.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : मनाशी प्रत्येकाने स्वप्न पाहिले पाहिजे ते स्वप्न प्रत्यक्षात साकारण्यासाठी जिद्द व परिश्रम समर्पित करत चिकाटी बाळगल्यास यशाचे शिखर गाठता येते.

हे प्रत्यक्ष नागपूर येथील ईश्वरी कमलेश पांडे ही दृष्टीबाधित कन्या इयत्ता नववीत शिकत असून ती दररोज जलतरण प्रशिक्षण घेत आहे. (Disabled swimmer Eshwari has made an inspiring history nashik news)

तिला आंतरराष्ट्रीय जलतरणपटू होऊन भारताचे नाव उज्ज्वल करण्याचे स्वप्न साकारायचे म्हणून पहिला टप्पा म्हणून मुंबईच्या अरबी समुद्रात एलिफंटा ते गेट वे ऑफ इंडिया हे अंतर या पंधरा वर्षे दृष्टी नसलेल्या मुलींनी १७ किलो मीटरचे अंतर ४ तास २ मिनिटात पार करून राष्ट्रीय जलतरण मध्ये नेत्रदीपक कामगिरी केली, अशी माहिती नॅब महाराष्ट्र युनिटचे सचिव मुक्तेश्वर मुनशेट्टीवार यांनी दिली.

विशेष म्हणजे तीने प्रथमच सागरी अभियान केल्यामुळे अनेक आव्हानांना सामोरे जाऊन महाराष्ट्र राज्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला व दृष्टिबाधित कुठेही कमी नाही हे तिने सिद्ध केले. शार्क अॅक्वेटिक स्पोर्टिंग असोसिएशन व नॅब महाराष्ट्राच्या वतीने सहभाग घेतला होता. तिच्या जिद्दीचा प्रत्यक्ष नॅब महाराष्ट्राचे उपाध्यक्ष सूर्यभान साळुंखे, सचिव मुक्तेश्वर मुनशेट्टीवार व जिल्हा विकास आणि निधी संकलन प्रमुख रत्नाकर गायकवाड यांनी अनुभवला.

आता ती निश्चित आंतरराष्ट्रीय स्पर्धेत नाव लौकिक मिळवेल, अशी शुभेच्छा देवून नॅब महाराष्ट्रातर्फे रुपये ११ हजार रुपयांची आर्थिक मदतीचा धनादेश तिला प्रत्यक्षात सत्कार करून वितरण करण्यात आले. तिच्या या यशस्वी वाटचालीत जलतरण प्रशिक्षक संजय वाटवे, सुकदेव धुर्वे, ज्ञानेश ढाकुलकर, प्रफुल्ल भांगे, विशेष शिक्षक, तर ‘पेस स्विमर’ म्हणून इशांत पांडे, विलास फाले, रवींद्र तरारे व शंकर आष्टणकर यांनी भूमिका बजावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: 'श्रेयस, जैस्वाल, सिराज पाकिस्तानमध्ये असते, तर...' भारतीय संघातून वगळल्यानंतर माजी क्रिकेटपटूचं मोठं विधान

Thane News: काँग्रेस नेत्यांवर थेट आरोप! माजी नगरसेवकांचा पक्षत्याग, भाजपात प्रवेश करत नाराजी उघड केली

गिरीश ओक-निवेदिता सराफची जोडी पुन्हा पहायला मिळणार, 'बिन लग्नाची गोष्ट'सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित, प्रिया बापट आणि उमेश कामतची गोड केमिस्ट्री

Maharashtra Latest News Update: राष्ट्रीय महामार्गांवर दुचाकी वाहनांना टोल नाही, NHAI चे अधिकृत स्पष्टीकरण

Soldier caught pigeon on border : भारत-पाकिस्तान सीमेजवळ जवानांनी पकडलं एका गंभीर धमकीच्या पत्रासह कबुतर!

SCROLL FOR NEXT