Nashik Municipal Corporation
Nashik Municipal Corporation e-sakal
नाशिक

पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन कक्ष

विक्रांत मते

नाशिक : पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर शहरात आपत्ती टाळण्यासाठी महापालिका मुख्यालयासह सहा विभागात आपत्ती व्यवस्थापन(Disaster Management) कक्ष उभारण्याच्या सूचना आयुक्त कैलास जाधव यांनी विभागीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.(Disaster Management Cell on the backdrop of monsoon : Municipal Commissioner)

२४ तास कर्मचाऱ्यांची नियुक्ती

तौक्ते वादळामुळे(tauktae cyclone) शहरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. या पार्श्वभूमीवर आयुक्त जाधव यांनी विभागीय अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. बैठकीत आपत्ती आल्यास सामना कसा करता येईल, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा सादर करण्यात आला, परंतु त्रुटी आढळल्याने बांधकाम विभाग व नगररचना विभागाने समन्वय साधून त्रुटी दूर करण्याच्या सूचना दिल्या. पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर विभागीय कार्यालयांमध्ये नियंत्रण कक्ष स्थापन केला जाणार आहे. यामध्ये २४ तास कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी. नियंत्रण कक्षात आपत्ती व्यवस्थापनाबाबत सर्व फोन नंबर, अधिकारी, कर्मचाऱ्यांची अद्ययावत माहिती अवगत करावी, स्वयंसेवी संस्थांची यादी, तसेच अग्निशमन बंब व अग्निरोधक यंत्रणा सुस्थितीत ठेवण्याचे सूचना देण्यात आल्या.

नोटिशींचा सोपस्कार नको, फिल्डवर काम हवे

सामाजिक दायित्व निधीतून आपत्ती व्यवस्थापनासाठी साधनांची माहिती घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर नगररचना विभागातर्फे धोकादायक घरे जुन्या वाड्यांना(Old Houses) नोटिसा(notice) दिल्या जातात, मात्र या नोटिसांची फक्त सोपस्कार पार पाडला जातो. प्रत्यक्षात फिल्डवर जाऊन काम करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. खरोखर धोकादायक असतील तेथील नागरिकांना हलवावे, तसेच जुने वाडे याबाबतची माहिती सादर करण्याच्या सूचना नगररचना व बांधकाम विभागाला देण्यात आल्या.

साथरोग औषधांची खरेदी

कोरोना संसर्गाच्या(Corona virus) सामना करत असताना औषधांचा(Medicin) मोठा तुटवडा भासला. त्यामुळे पावसाळ्यात डेंगी(Dengue), मलेरिया(Malaria), चिकनगुनिया(Chikungunya) यासारख्या साथ रोगांचा(Communicable diseases) प्रादुर्भाव टाळण्यासाठी आवश्यक औषधे खरेदी करण्याच्या सूचना सार्वजनिक आरोग्य विभागाला देण्यात आल्या आहेत मुदतबाह्य औषधांचा(expire medicine) वापर न करण्याच्या सूचना वैद्यकीय विभागाला देण्यात आल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UAPA: ओसामा बिन लादेनचे फोटो, ISIS चे झेंडे बाळगणे गुन्हा नाही: हायकोर्ट

Viral: पवार गटाचं काम करणाऱ्याला दत्ता भरणे यांच्याकडून शिवीगाळ? व्हिडिओ रोहित पवारांकडून शेअर

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : महाराष्ट्रात 11 वाजेपर्यंत 18.18 टक्के मतदान; बारामतीमध्ये सर्वात कमी मतदानाची नोंद

Met Gala 2024 : परी म्हणू की सुंदरा! रेड कार्पेटवर ईशाचाच जलवा, स्पेशल फ्लोरल ड्रेस बनवण्यासाठी लागले तब्बल 10 हजार तास

Latest Marathi News Live Update: 'पन्नू हत्येप्रकरणी भारताच्या तपास अहवालाची वाट पाहतोय': अमेरिका

SCROLL FOR NEXT