couple in farm.jpg 
नाशिक

आश्चर्यच! नवरा-नवरीच्या डोक्यावर अक्षता पडताच...नवदाम्पत्य शिरलं भुईमुगाच्या शेतात..!

हर्षल गांगुर्डे : सकाळ वृत्तसेवा

नाशिक :  लग्नमंडपात सुरू असलेली पाहुण्यांची रेलचेल, नवरा-नवरीच्या गळ्यात पडलेले हार, लॉकडाउन अनलॉक होताना पार पडलेले हे लग्न चर्चेत आले ते अक्षता पडताच नवरा-नवरीने लगेचच शेतात शिरले...आणि काय केले...तुम्हीच वाचा...

अक्षता पडल्या डोक्यावर...आणि ते थेट शेतात
मंगरूळ (ता. चांदवड) येथील शेतकरी अशोक निरभवणे यांची कन्या करुणा व कोकणखेडे येथील बाळू एळिंजे यांचा मुलगा संदीप यांचा गुरुवारी (ता. 11) मंगरूळ येथे सोशल डिस्टन्स पाळून विवाह पार पडला. एकीकडे लग्नाची रेलचेल, तर दुसरीकडे पेरणीची लगबग. एकीकडे सनई-चौघड्याचे सूर, तर दुसरीकडे पावसापूर्वी होणारा ढगांचा गडगडाट सुरू होता. अशात जोराचा पाऊस आलाच तर सासऱ्यांची पुढील काही दिवस पेरणी खोळंबेल, लग्न तर लागले मग पेरणी करण्यास काय हरकत आहे, असा विचार करून नवरदेव संदीप याने लगेचच शेत गाठत औत धरले. सर्जा-राजाच्या साथीने संदीप व करुणा या नवदांपत्याने भुईमूग पेरणी केली. 

नवरा-नवरीने घेतला पेरणी करण्याचा निर्णय
चांदवड तालुक्‍यात सध्या शेतकऱ्यांची पेरणीची मोठी लगबग सुरू आहे, अशात आज एका बाजूला लग्न पार पडत होते, तर दुसरीकडे पावसाचे वातावरण झाल्याने नवरीच्या वडिलांनाही पेरणीची काळजी लागली होती. अशात नवरा-नवरीने पेरणी करण्याचा निर्णय घेतल्याने आम्हा सर्वांना शेतीला प्राधान्य देणाऱ्या या दांपत्याचा अभिमान वाटला. -वाल्मीक वानखेडे, नवरीचे मामा 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! मुंबई-पुणे एक्सप्रेसवे मिसिंग लिंक पूर्ण; पहिला ड्रोन व्हिडिओ आला समोर, उद्घाटनाची तारीख काय?

Salman Agha Runout: आधी रनआऊट झाला अन् मग हेल्मेट फेकलं... पाकिस्तानच्या सलमान आघावर ICC ची कारवाई

Maharashtra State Cooperative Bank : राज्य बँक ठरली यूपीआय स्वीकारणारी देशातील पहिली शिखर बँक

LPG Gas: गॅस तुटवड्याच्या काळात उज्ज्वला गॅस योजनेचं काय झालं? खडसे यांनी उपस्थित केला महत्त्वाचा मुद्दा, म्हणाल्या...

VIDEO : लिफ्टमध्ये अडकला सात महिन्यांच्या चिमुकल्याचा हात, पुण्यातील घटना; धडकी भरवणारा व्हिडीओ समोर...

SCROLL FOR NEXT