corona at malegoan.jpg 
नाशिक

काय मालेगावकरांनो?ओढवूनच घेतली ना कोरोना हॉटस्पॉटची नामुष्की!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : नाशिक शहरासह जिल्ह्याचा अन्य सर्व भाग कोविड-19 विषाणू संसर्गापासून बऱ्यापैकी सुरक्षित ठेवण्यात यश आलेल्या जिल्हा प्रशासनापुढे मालेगाव शहराने मात्र चिंता वाढविली आहे. शंभराहून अधिक रुग्ण, दहा मृत्यू आणि अल्पसंख्याकबहुल भागात विषाणूचा संसर्ग या कारणांनी हॉटस्पॉट बनलेल्या मालेगावची ही चिंताजनक स्थिती तेथील रहिवाशांमुळेच निर्माण झाल्याच्या निष्कर्षाप्रत प्रशासन पोचले असून, यापुढील काळात संसर्ग रोखण्याच्या सगळ्या उपायांची अधिक कडक अंमलबजावणी केली जाणार आहे. 

मालेगावकरांनीच ओढवून घेतली कोरोना हॉटस्पॉटची नामुष्की 

कोरोना प्रभावित भागातील खासगी दवाखान्यांमधून बाधितांची माहिती लपवली जात असल्याच्या संशयामुळे ते बंद ठेवण्याचे आदेश आहेत. आता हे खासगी व्यावसायिक शहरातील आरोग्य व्यवस्थेबाबत चुकीची माहिती पसरवीत असल्याची बाब उजेडात आली आहे. कोरोनाचा कम्युनिटी स्प्रेड झाल्याचा दावा केला जात आहे. या सरळ सरळ अफवा असून, अशी चुकीची माहिती पसरविणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. 

जिल्ह्याच्या 90 टक्‍के भागात विषाणू संसर्ग रोखण्यात यश 
गुरुवारी सकाळी मालेगावमध्ये पोलिसांवर जमावाकडून हल्ल्याचा प्रयत्न झाला. या घटनेची प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. रेशनिंगच्या धान्यासाठी हा जमाव रस्त्यावर आल्याचा दावा करण्यात आला; परंतु तो चुकीचा आहे. रस्त्यावर येणाऱ्यांकडून त्यासाठी दिली जाणारी कारणे दिशाभूल करणारी आहेत, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

आणि मालेगाव मात्र हॉटस्पॉट 

खरी अडचण मालेगावमधील स्थानिकांच्या वर्तणुकीत आहे. जिल्ह्याच्या सगळ्या भागात प्रशासन सारखे आहे, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजना सारख्या आहेत. रेशन व अन्य जीवनावश्‍यक वस्तूंच्या पुरवठ्याचे धोरण सारखे आहे, निधी वितरणही सारखेच आहे. तरीदेखील जिल्ह्याचा 90 टक्‍के भाग कोरोनामुक्‍त आहे आणि मालेगाव मात्र हॉटस्पॉट बनले, हा फरक लक्षात घेणे गरजेचे आहे, याकडे प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष वेधले. 

कोरोनाविरोधातील लढाईत निधीची अडचण नाही
मालेगावमधील कोरोनाविरोधातील लढाईत निधीची अडचण अजिबात नाही. लॉकडाउनच्या काळात जीवनावश्‍यक वस्तूंचा तुटवडा भासू नये यासाठी जिल्हा प्रशासनाने मालेगावच्या महापालिका आयुक्‍तांना 20 लाख, तर तहसीलदारांना 40 लाख रुपये अतिरिक्‍त निधी दिला आहे. याशिवाय, दानशूर व्यक्‍ती मोठ्या संख्येने पुढे आल्या आहेत. - सूरज मांढरे, जिल्हाधिकारी, नाशिक 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder 5 KG पाच किलो एलपीजी सिलिंडरबाबत नवा नियम, खरेदीसाठी ओळखपत्र बंधनकारक

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

SCROLL FOR NEXT