SYSTEM
नाशिक

नाशिक : पोलिस व भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये 'तू तू मै मै'

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : राज्यात सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडीविरोधात (Mahavikas Aghadi) असलेल्या भारतीय जनता पक्षात (BJP) दिवसेंदिवस संघर्ष टोकाला पोचत असल्याचे दिसून येत आहे. नाशिकमध्ये नमामी गोदा प्रकल्पाचे भूमिपूजनानंतर पोलिसांनी महापौर सतीश कुलकर्णी व शहराध्यक्ष गिरीश पालवे यांना नोटिसा बजावल्याने खळबळ उडाली.

कार्यक्रमाला परवानगी नव्हती...

महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने भाजपतर्फे विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे उद्‌घाटन होत आहे. महापालिकेत सत्तेवर असलेल्या भाजपच्या सहाव्या पंचवार्षिकमधील आजचा शेवटचा दिवस. या दिवसाचे मुहूर्त साधून नमामि गोदा प्रकल्पाचे भूमिपूजन व लॉजिस्टिक पार्क भूमिपूजनाचा कार्यक्रम रविवारी (ताआ. १३) योजित करण्यात आला होता. दुपारी लॉजिस्टिक पार्कचा भूमिपूजन कार्यक्रम झाल्यानंतर सायंकाळी गोदा प्रकल्पाचे भूमिपूजन करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रम सुरू असतानाच पोलिसांनी भाजप पदाधिकाऱ्यांना डीजे बँड बंद करण्याच्या सूचना दिल्या. कार्यक्रमाला परवानगी नसल्याचे कारण दिले. मात्र, केंद्र सरकार व महापालिकेचा संयुक्त कार्यक्रम असल्याचा दावा करत पोलिसांची भूमिका चुकीची असल्याचा दावा करण्यात आला. कार्यक्रम संपल्यानंतर पोलिस थेट भाजप कार्यालयात पोहोचले. तेथे कार्यक्रमाचे आयोजक म्हणून महापौर सतीश कुलकर्णी व शहराध्यक्ष गिरीश पालवे यांना नोटीस बजावली.

पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहुल ढिकले यांच्यासह आमदार प्रा. देवयानी फरांदे व सीमा हिरे यांनी मध्यस्थी केली. मात्र, पोलिसांनी तिघी आमदारांच्या भूमिकेला न जुमानता नोटीस बजावल्याने नमामि गोदा प्रकल्पाचा मुद्दा राज्यभर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या अडीच वर्षांपासून सत्तेवर असलेल्या प्रथम नागरिक महापौर सतीश कुलकर्णी यांचा कारकिर्दीतील शेवटचा दिवस वादाने समाप्त झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर लागू झाल्यापासून केवळ २७ प्रमाणपत्रांचं वाटप; सरसकट आरक्षण नाहीच, दिशाभूल कोण करतंय?

Dhantrayodashi 2025: धनत्रयोदशीच्या दिवशी या ७ शुभ वस्तू घरी आणा; लक्ष्मीमातेची कृपा सदैव राहील

Ajit Pawar: बिबट्यांची नसबंदी करणार; अजित पवार यांची माहिती, केंद्र सरकारकडे पाठविणार प्रस्ताव

Kane Williamson आयपीएलमध्ये परतणार; रिषभ पंतसोबत दिसणार, जाणून घ्या कोणती जबाबदारी सांभाळणार

चंद्रकांत कुलकर्णी लिखित 'चिरंजीव परफेक्ट बिघडलाय' आता व्यवसायिक रंगभूमीवर; दिसणार हे कलाकार

SCROLL FOR NEXT