dispute in chhagan bhujbal mla kande was settled after the mediation of nashik collector
dispute in chhagan bhujbal mla kande was settled after the mediation of nashik collector  Sakal
नाशिक

भुजबळ-कांदे यांच्यात पॅचअप; कलेक्टरांच्या मध्यस्थीने मिटला वाद

विनोद बेदरकर

नाशिक : पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि शिवसेनेचे आमदार सुहास कांदे (MLA Suhas Kande) आणि जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्यातील बंद दाराआड झालेल्या गुप्त बैठकीनंतर भुजबळ व कांदे यांच्यात दिलमजाई झाली आहे. जिल्हा नियोजन समितीच्या पाच टक्के आप्तकालीन निधीवरुन शनिवारी दोघांत कलगीतुरा रंगला होता.

साप्ताहीक कोरोना आढावा बैठकीनंतर भुजबळ- आमदार कांदे आणि जिल्हाधिकारी मांढरे यांच्यात सुमारे पाउन तास नियोजन भवनाच्या बंद दाराआड चर्चा झाली आणि हे पॅचअप झाले. नांदगाव मतदार संघात सुहास कांदे शिवसेनेचे आमदार असून याच मतदार संघात त्यांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ यांचा पराभव करुन ते निवडून आले आहेत.

नांदगावला (Nandgaon Flood) शुक्रवारच्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळित झाले असतांना पूरग्रस्तांना जिल्हा नियोजन समितीच्या आपतकालीन निधीतून पाच टक्के निधी द्यावा. सांगली सातारा जिल्ह्यातील पूरग्रस्तांप्रमाणे नांदगावच्या पूरग्रस्तांना मदत का मिळत नाही. पालकमंत्री भुजबळ यांच्यात जाणूनबुजून अडसर असल्याची कांदे यांची भावना असून त्यातून शनिवारी भुजबळ व कांदे यांच्यात बैठकीत कलगीतुरा रंगला होता. त्यापार्श्वभूमीवर आजच्या बैठकीत प्रथमच कांदे नाशिकला आले बैठकीनंतर जिल्हाधिकाऱ्यांसह तिघांची बंद दाराआड चर्चा होउन त्यानंतर आमच्यात असे काही नसल्याचा संदेश देण्यासाठी तिघांची एकत्रित पत्रपरिषद झाली.

असे झाले पॅचॲप

कोल्हापूर, सांगली सातारा येथील पूरग्रस्तांप्रमाणे नांदगावच्या पूरग्रस्तांना जिल्हा नियोजन समितीतून ५ टक्के आपत्तकालीन निधी मिळत नाही ही आमदार कांदे यांची भावना असून हे या वादाचे मूळ आहे. तर जिल्हा नियोजन समितीतून आप्तकालीन निधीची सोय असली तरी, कोरोना निर्बंधामुळे शासनाचे एकुण निधीला कट लावला असून मृत व्यक्ती, जनावरे, बेघरांच्या भोजनशिवाय इतर खर्च करता येत नाही. पंचनाम्यासह पूरग्रस्तांना २०१८ पासूनच निधी नसल्याने नांदगावच्या पूरग्रस्तांना लगेच निधी कसा द्यायचा? ही जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष असलेल्या पालकमंत्री छगन भुजबळ यांचे म्हणणे आहे. मात्र याच जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शासनाला त्वरीत प्रस्ताव पाठवून पुर्नविनियोगाचे आश्वासन देत दोघांत पॅचअप घडविले.

भुजबळसाहेब तर आमचे नेते

पालकमंत्री छगन भुजबळ साहेब हे आमच्या महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते आहे. आमच्यात वैयक्तीक वादाचा विषय नाही. मतदार संघातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मी शनिवारी बोललो. २०२१ च्या शासन निर्णयानुसार, राज्यातील इतर पूरग्रस्त जिल्ह्यांना मदत झाली. मग नांदगावला का नाही. हा विषय होता. मात्र त्यात जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाला प्रस्ताव पाठवून मदतीचे आश्वासन दिले आहे.

- सुहास कांदे (आमदार नांदगाव)

आता बस झाला कलगीतुरा

कोरोना निर्बंधामुळे खर्चावर निर्बंध आले आहे. नांदगावच नव्हे तर रायगडला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनाही अशा मागण्यांना सामोरे जावे लागले होते. शासनाचे पैसे हे काही मंत्र्यांना येत नाही. सचिवांपासून तर जिल्हाधिकाऱ्यांपर्यतची व्यवस्था असते. जिल्हाधिकारी तातडीची मदत आणि विशेष बाब म्हणून शासनाला प्रस्ताव देणार आहे. त्यामुळे आम्ही हा विषय थांबवत आहोत.

- छगन भुजबळ (पालकमंत्री, नाशिक)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Constitution : '...तर मोदी सरकारने केव्हाच देशाचे संविधान बदलले असते'

Pratik Gandhi : प्रतीक साकारतोय गांधी ; हॅरी पॉटर फेम 'या' अभिनेत्याची सिनेमात वर्णी

Reels Addiction : इन्स्टाग्राम अन् यूट्यूबचं कशामुळे लागतंय व्यसन? जाणून घ्या कसं काम करतं अल्गोरिदम..

Rishabh Pant: "ऋषभ पंतसोबत लग्न कर, तो तुला खुश ठेवेल..."; नेटकऱ्याची कमेंट, उर्वशीनं अवघ्या दोन शब्दात दिलं उत्तर

'संजय राऊत माझा छळ करत आहेत'; निलम गोऱ्हेंनी वाचून दाखवलं स्वप्ना पाटकरांचं निवेदन

SCROLL FOR NEXT