Distribution of disinfectant tablets to 12 lakh children in district today nashik news esakal
नाशिक

Nashik News : जिल्ह्यातील 12 लाख बालकांना आज जंतूनाशक गोळ्यांचे वाटप

राष्ट्रीय जंतूनाशक दिनानिमित्त १ ते १९ या वयोगटातील बालक व किशोरवयीन मुला मुलींना मंगळवारी (ता.१३) अंगणवाडी व शाळास्तरावर जंतूनाशक गोळी देण्यात येणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : राष्ट्रीय जंतूनाशक दिनानिमित्त १ ते १९ या वयोगटातील बालक व किशोरवयीन मुला मुलींना मंगळवारी (ता.१३) अंगणवाडी व शाळास्तरावर जंतूनाशक गोळी देण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील १५ तालुक्यामधील अंगणवाड्या व शाळांमध्ये नोंद असलेले तसेच शाळाबाहय बालकांचे एकूण १२ लाख ३६ हजार ३४९ बालकांना जंतूनाशक गोळी देण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. (Distribution of disinfectant tablets to 12 lakh children in district today nashik news)

सर्व सरकारी व खासगी शाळा शिक्षक अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकांमार्फत तसेच आरोग्य आशा स्वयंसेविकामार्फत बालकांना जंतूनाशक गोळी प्रत्यक्ष खाऊ घातली जाणार आहे अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सुधाकर मोरे यांनी दिली.

जिल्ह्यातील १५ तालुक्यांमध्ये ५ हजार २३२ अंगणवाड्या तसेच ५ हजार ३२ सरकारी व खासगी शाळा यातील १२ लाख ३६ हजार ३४९ बालकांना जंतूनाशक गोळी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

गोळी दिलेल्या प्रत्येक बालक लाभार्थ्यांची नोंद ठेवली जाणार आहे. ज्या मुला मुलींना १३ फेब्रुवारी रोजी जंतूनाशक गोळी खाल्ली नसेल त्यांना २० फेब्रुवारी रोजी माप ऑफ दिवशी गोळी देण्यात येईल, असेही डॉ. मोरे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parel-Chinchpokli: ईद-मिलादच्या मिरवणुकीदरम्यान राडा! धक्काबुक्की, दगडफेक अन् धार्मिक घोषणाबाजी; परळ-चिंचपोकळीत तणाव, Video Viral

Jayant Patil BJP Entry : जयंत पाटील भाजपात जाणार?, ४५ वर्षे खांद्याला खांदा देणाऱ्या दिलीप तात्यांच्या वाढदिवस कार्यक्रमात केला खुलासा

Girish Mahajan: ‘तुमचे घोडे नेमके कुठे अडले, मला कळत नाही’; सावळीविहीर रस्त्याच्या प्रश्नावर गिरीश महाजन आक्रमक

Marathi News Live Updates : अंबाबाई मंदिर परिसरातील रस्त्यांची चाळण, खड्ड्यांत शिवसैनिक लावणार झाडे

Pune University: पेपरफुटी, भ्रष्ट व्यवस्थेविरोधात मोठा लढा; ‘आयसा’चा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT