Nashik News  esakal
नाशिक

Nashik News : कुसुमाग्रजांच्या स्मृतिदिनी जनस्थान पुरस्कारांचे वितरण

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे वर्षाआड देण्यात येणारा मानाचा ‘जनस्थान’ पुरस्कार यंदा ज्येष्ठ कादंबरीकार आशा बगे यांना जाहीर झाला आहे. एक लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

प्रतिष्ठानचे कार्यवाह मकरंद हिंगणे यांनी शनिवारी (ता. २८) पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. तात्यासाहेब शिरवाडकर यांच्या स्मृतिदिनी १० मार्चला सायंकाळी सहाला महाकवी कालिदास कलामंदिरात होणाऱ्या समारंभात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल.

डॉ. अनुपमा उजगरे, संध्या नरे-पवार, प्रफुल्ल शिलेदार, डॉ. सदानंद बोरसे व अविनाश सप्रे यांच्या निवड समितीने श्रीमती बगे यांची जनस्थान पुरस्कारासाठी निवड केली.

प्रतिष्ठानतर्फे १९९१ पासून दर दोन वर्षांनी साहित्य क्षेत्रातील मान्यवरांना जनस्थान पुरस्काराने गौरविण्यात येते. त्यामध्ये आतापर्यंत विजय तेंडुलकर, विंदा करंदीकर, इंदिरा संत, गंगाधर गाडगीळ, व्यंकटेश माडगूळकर, श्री. ना. पेंडसे, मंगेश पाडगावकर, नारायण सुर्वे, बाबूराव बागूल, ना. धों. महानोर, महेश एलकुंचवार, भालचंद्र नेमाडे, अरुण साधू, विजया राजाध्यक्ष, वसंत आबाजी डहाके, मधू मंगेश कर्णिक या मान्यवरांना सन्मानित करण्यात आले आहे. आशा

बगे या मराठी भाषेत लिहिणाऱ्या भारतीय कादंबरीकार व लेखिका असून, त्यांच्या ‘भूमी’ या कादंबरीला २००६ चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्या लेखनाची सुरवात ‘सत्यकथे’पासून झाली.

मौजच्या दिवाळी अंकात नेमाने लेखन करणाऱ्या आशा बगे यांच्या २०१८ पर्यंत १३ लघुकथासंग्रह, सात कादंबऱ्या, ललित लेखांची दोन पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत.

त्यांचा ‘मारवा’ हा कथासंग्रह विशेष प्रसिद्ध आहे, तर भूमी व त्रिदल या कादंबऱ्यांना अनेक सन्मान मिळाले आहेत. दरम्यान, पत्रकार परिषदेस माजी आमदार हेमंत टकले, लोकेश शेवडे, प्रकाश होळकर, ॲड. अजय निकम, राजेंद्र डोखळे, अरविंद ओढेकर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT