sugar distribute.jpg
sugar distribute.jpg 
नाशिक

गरीबांची दिवाळी यंदा होणार गोड! कोरोना काळात पुरवठा विभागाकडून कार्डधारकांना साखर वाटप

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत जिल्ह्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारकांसाठी शासनाने ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या तीन महिन्यांसाठी नियमित नियतन मंजूर केले आहे. बीपीएल अंत्योदय योजनेतील कार्डधारकांना प्रति शिधापत्रिका एक किलो याप्रमाणे साखर वाटप केली जाणार आहे. त्यामुळे यंदा अंत्योदय शिधापत्रिकाधारकांची दिवाळी गोड होणार आहे.

 कोरोना काळात पुरवठा विभागाकडून कार्डधारकांना मोठा दिलासा 

कोरोनाच्या संकट काळात पुरवठा विभागाकडून कार्डधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील सुमारे पावणेदोन लाख कार्डधारकांना ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात साखर वाटप केली जाणार आहे. या योजनेतील कार्डधारकांसाठी जिल्ह्याला सुमारे ४६२३ क्विंटल साखरेचे नियतन मंजूर करण्यात आले आहे. कार्डावरील नियमित धान्य आणि गरीब कल्याण योजनेंतर्गत मोफत धान्यांचा लाभ देखील जिल्ह्यातील कार्डधारकांना झालेला आहे. आता अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना साखरेचेही वाटप केले जाणार आहे. या साखरेची उचल करून स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून वितरण केले जाणार आहे.

रेशन दुकानांमध्ये जाऊन साखरेची मागणी करावी

याबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंंद नरसीकर यांनी सांगितले, अंत्योदय कार्डधारकांना तीन महिन्यांसाठीचे साखरेचे वाटप केले जाणार आहे. अंत्योदय शिधापत्रिकाधारकांनी रेशन दुकानांमध्ये जाऊन साखरेची मागणी करावी. तालुकानिहाय मंजूर साखरेची उचल करून स्वस्त धान्य दुकानांमध्ये साखर पोहच केली जाणार आहे.

प्रत्येक तालुक्यासाठी प्राप्त झालेल्या साखरेचे क्विंटल याप्रमाणे जिल्ह्यातील एकुण ४६२३ क्विटल साखरेचे नियतन मंजूर झालेले आहे.

धान्य वितरण अधिकारी नाशिक २५४ क्विंटल,

धान्य वितरण अधिकरी मालेगाव ३८८,

इगतपुरी २५०,

कळवण २१५,

मालेगाव ३५०,

नाशिक २४६,

बागलाण ३९०,

चांदवड १९९,

दिंडोरी ३१९,

सुरगाणा ३९२.५०,

त्र्यंबकेश्वर २२५,

येवला ३००

देवळा १४७,

निफाड २२०.५० ,

नांदगाव १००,

मनमाड ८६,

पेठ ३०५,

सिन्नर २३६,
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: रांग मोडून आत शिरला! आप आमदाराच्या मुलाची दादागिरी; पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना मारहाण

Mumbai News: बर्गर खाल्ल्याने तरुणाचा मृत्यू, मुंबईत घडली धक्कादायक घटना, वाचा नक्की काय आहे प्रकरण

Sanju Samson Wicket Controversy : संजू सॅमसन OUT की NOT OUT? कॅचवरून पेटला वाद; सामन्यादरम्यान मैदानात राडा

Hindustan Zinc : हिंदुस्थान झिंकच्या शेअर्समध्ये तेजी, डिव्हिडेंडच्या आशेने शेअर्समध्ये जोरदार खरदी...

Latest Marathi News Live Update : पश्चिम रेल्वेवर दादर येथे तांत्रिक बिघाड झाल्यामुळे गाड्या 15 ते 20 मिनिट उशिराने

SCROLL FOR NEXT