ZP Nashik esakal
नाशिक

जिल्हा प्रशासनाची दिरंगाई निवडणुकांच्या मुळावर?

विक्रांत मते

नाशिक : जिल्हा परिषद (ZP) व पंचायत समित्यांचे गट व गणांचा प्रारूप आराखडा सादर करण्यासाठी आजचा मुहूर्त निश्‍चित केलेला असताना प्रशासनाच्या दिरंगाईमुळे विभागीय आयुक्तांना अहवाल सादर झाला नाही. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्धारित वेळापत्रकानुसार निवडणुकीचे कामकाज होत नसल्याने त्याचा परिणाम निवडणुकांवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

जिल्हा परिषदेची मुदत संपुष्टात आल्यानंतर प्रशासकीय राजवट सुरु झाली. निवडणुकांना ओबीसी आरक्षणाचा निर्णय कारणीभूत ठरला. 4 मे ला न्यायालयाने पंधरा दिवसात निवडणुकांसंदर्भात निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या.

त्यानुसार जिल्हा परिषद (ZP),पंचायत समितीच्या गट व गण संदर्भात यापूर्वी फेब्रुवारी २०२२ मध्ये तयार करण्यात आलेला आराखडा रद्द करण्यात आला. राज्य निवडणूक आयोगाने गट व गण प्रारूप रचनांचा सुधारित कार्यक्रम जाहीर करताना प्रारूप आराखडे मान्यतेचे अधिकार विभागीय आयुक्तांना दिले. त्यानुसार प्रारूप आराखडा तयार करण्याचे काम २३ मेपासून सुरु झाले.

२७ जूनला अंतिम प्रारूप आराखडा प्रसिद्ध केला जाणार आहे. निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार सोमवारी विभागीय आयुक्तांना गट व गणाचे आराखडे सादर करायचे होते. मात्र, दिरंगाईमुळे कार्यवाही झाली नाही. येत्या चार ते पाच दिवसांत आराखडा सादर केला जाणार आहे, अशी माहिती ग्रामपंचायत विभागाचे उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे (Deputy Collector Nitin Gawande) यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : नसरापूर प्रकरणातील आरोपीवर सर्व सात गुन्हे सिद्ध झालेत- न्यायाधीश

Nasrapur Case Verdict : नसरापूर हत्याप्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला फाशी की जन्मठेप? आज न्यायालयाचा अंतिम निकाल

Shaktipeeth Highway : अदानी-अंबानींसाठी सुपीक जमीन जाणार? 'शक्तिपीठ' महामार्गावरून सांगलीतील शेतकऱ्यांचा एल्गार, जिल्हा परिषदेवर वाढला दबाव

Sangli DCC Bank : नातेवाइकांना कोट्यवधींची कर्जमाफी? नाबार्डच्या तपासणीत मोठा खुलासा, सांगली जिल्हा बँक अडचणीत, आमदार पडळकरांचा संचालकांवर गंभीर आरोप

Wife Mental Harassment Case : घरात झाडू मारतो, भांडी घासतो, तरीही बायको मारहाण करते... तरुणाने व्हिडिओ शेअर करत संपवले जीवन

SCROLL FOR NEXT