Maharashtra Unseasonal Rain
Maharashtra Unseasonal Rain esakal
नाशिक

Unseasonal Rain: जिल्ह्याला पुन्हा अवकाळीचा तडाखा! गारपिटीने रब्बीसह द्राक्षे-कांदा अन् भाजीपाल्यालाही फटका

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : जिल्ह्यात मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस आणि सोबत गारपिटीला गुरुवारी (ता. १६) पहाटेपासून सुरवात झाली. सकाळपर्यंत ही स्थिती कायम होती. त्याचवेळी सकाळी काळ्याकुट्ट ढगांनी आसमंत व्यापल्याने बऱ्याच ठिकाणी अंधारून आले होते.

या आपत्तीमुळे रब्बी हंगामातील गहू, हरभऱ्यासह द्राक्षे, कांदा आणि भाजीपाल्याला फटका बसला. (district again hit by unseasonal rain Grapes onion and vegetables affected by hailstorm nashik news)

हेही वाचा : ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?

द्राक्ष-कांदापंढरी असलेल्या निफाड तालुक्यात अवकाळीच्या फेऱ्यामुळे कृषी क्षेत्रात राबवणाऱ्यांचे अवसान गळाले आहे. चांदोरी भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. मुंबई-आग्रा महामार्गावर वाहतूक संथ झालेली असताना इगतपुरी परिसरात रिमझिम पाऊस झाला आहे.

बागलाण तालुक्यात कांदा पिकावर करप्याचे संकट घोंघावू लागले आहे. देवळा तालुक्यातही जोरदार पावसाने हजेरी लावली. सिन्नर तालुक्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. त्याचवेळी गारपीट झाली आहे.

त्यात कांदा, द्राक्षे, हरभरा, गव्हाचे नुकसान झाले आहे. घाटमाथ्यावर जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागाने जिल्ह्यात येत्या रविवारपर्यंत (ता. १९) हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला आहे. दरम्यान, नाशिकमध्ये गुरुवारी सकाळी आठपर्यंत ९.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : राजस्थान क्वालिफाय करणार की हैदराबाद मजबूत स्थितीत पोहचणार?

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

PPF : दररोज 250 रुपये वाचवून तयार होईल 24 लाखांचा फंड, कसा ते वाचा ?

Rinku Singh T20 WC 2024 : रोहितला जास्त पर्याय... रिंकू सिंहला वगळण्याबाबत अजित आगरकर काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT