Animals tied for slaughter on Morane Road being transported to Go School in a vehicle. esakal
नाशिक

Nashik Crime News : जिल्ह्यातील नववर्षातील सर्वात मोठी कारवाई; 41 जनावरांची सुटका

सकाळ वृत्तसेवा

अंबासन (जि. नाशिक) : येथील मोराणे रस्त्यावरील मोसम नदीजवळ असलेल्या ब्रिटिशकालीन बंधाऱ्या जवळ कत्तलीच्या इराद्याने दोरीने बांधून ठेवलेल्या ४१ जनावरांची पोलिसांच्या पथकाने सुटका केली. (District Biggest New Year Action 41 Rescue of animals Nashik Crime News)

अंबासन, मोराणे रस्त्यावरील यशोदा शेलार या महिलेने शेतातील घराजवळ कत्तलीच्या इराद्याने तब्बल ४१ जनावरे निर्दयपणे बांधून ठेवल्याची गुप्त माहिती अग्निवीर हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांना लागताच संबंधित कार्यकर्त्यांनी पोलिस अधिक्षक शहाजी उमाप व माजी पोलिस महासंचालक प्रतापराव दिघावकर यांना माहिती दिली.

त्याप्रमाणेच जायखेडा पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांनी अप्पर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती व विभागीय पोलिस अधीक्षक पुष्कराज सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनानुसार तातडीने पोलिस उपनिरीक्षक तुषार भदाणे सह हवालदार राजेंद्र सोनवणे व गजानन गोटमवार यांनी रात्रीतून जनावरांवर निगराणी राखली.

हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

मात्र संबंधित गोवंश वाहतूक करणाऱ्यांना कुणकुण लागताच जणांवर घेण्यासाठी आलेच नाहीत. पहाटे सहाच्या सुमारास पोलिस प्रशासन निर्दयीपणे बांधलेली जनावरे ताब्यात घेऊन पोलिसांनी घटनास्थळीच पंचनामा केला व अग्निवीर संघटनेच्या कार्यकत्यांच्या मदतीने गोशाळेत सदर गोवंश जातीच्या ४१ जनावरांची रवानगी करून जनावरांची मुक्तता केली.

यावेळी अग्निवीर हिंदू संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, रमेश चव्हाण, गणेश खैरनार, भूषण गुरव, मोहन शेवाळे, सचिन पाटील, विशाल गवळे, शुभम वाघ, गुरू पाटील, मयूर कासार, गणेश भामरे, वैभव भामरे, विशाल भामरे, बंटी शिंदे, प्रवीण भामरे, धीरज कोर, निशांत कोर, उमेश पगारे, चंद्रकांत कोर यांनी सहकार्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sayaji Shinde on Bhimashankar project : "पर्यावरण नष्ट करायला तुम्हाला निवडून दिलंय का?"; कर्जत-भीमाशंकरमधील प्रकल्पावरून सयाजी शिंदे भडकले, १ लाख तरुणांची फौज उतरवण्याचा इशारा!

Manchar News : आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर महाराष्ट्राचा आवाज! मंचरचे जैव ऊर्जा तज्ञ ॲड. राहुल पडवळ यांचा नवी दिल्लीत आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर गौरव

Pune News : मध्यवर्ती पेठांमध्ये दिवसा मालवाहतुकीस बंदी; मालाची चढ-उतार करण्यास रात्री ११ ते सकाळी ९ या वेळेतच परवानगी

Ganja Smuggling : गांजाची तस्करी करणाऱ्या वाहतूक पोलिसाला तेलंगणात अटक

Pune News : पक्षकाराची सही, प्रतिज्ञापत्र नसल्याने पोटगीचा दावा फेटाळला; उत्पन्नाचा तपशीलही दिला नाही

SCROLL FOR NEXT