eSakal (18).jpg 
नाशिक

जिल्हा शल्यचिकित्सकांना तासाभरातच पाठवले सक्तीच्या रजेवर! भुजबळांचा तीव्र संताप

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : नाशिक शहर व जिल्हा कोरोना सद्यस्थिती व उपाययोजना आढावा बैठक राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत काल (ता.२) पार पडली. या बैठकीनंतर मंत्री छगन भुजबळ यांनी जिल्हा रुग्णालयातील दिरंगाई आणि गलथान कारभाराबाबत तातडीने आरोग्य मंत्र्यांशी फोनद्वारे संवाद साधला. त्यानंतर तासाभरातच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रत्ना रावखंडे यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे.

हलगर्जीपणामुळे पालकमंत्र्यांचा तीव्र संताप
पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला. यावेळी नाशिक जिल्ह्यासाठी २२८ व्हेंटिलेटर प्राप्त झाले असून त्यातील केवळ १९६ व्हेंटिलेटर बसवण्यात आले. त्यातील केवळ ग्रामीण मध्ये सात आणि जिल्हा रुग्णालयात सात असे एकूण १४ रुग्ण व्हेंटिलेटरवर रुग्ण उपचार घेत आहे.जिल्हा रुग्णालयात बसवण्यात आलेल्या ८० व्हेंटिलेटर पैकी 
फक्त ७ व्हेंटिलेटर रुग्णांच्या वापरात होते आणि पैकी ७३ व्हेंटिलेटर हे नॉन कोविड भागात विनावापर पडून आहेत.तसेच २३ व्हेंटिलेटर अद्याप कार्यान्वित न करता तसेच जिल्हाभरात पडून आहेत.व्हेंटिलेटर न मिळाल्याने एकीकडे रुग्ण दगावत असताना दुसरीकडे जिल्हा रुग्णालयातील अशा हलगर्जीपणामुळे पालकमंत्र्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.

समाधानकारक उत्तरे मिळाले नाही.
 तर विभागीय मुख्यालय असलेल्या नाशिक जिल्हा रुग्णालयात केवळ १०० बेड् कोरोनासाठी ठेवण्यात आले. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील उपजिल्हा रुग्णालय तसेच ग्रामीण रुग्णालयामधील डेडिक्टेड कोरोना रुग्णालये पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आले नाही.या हलगर्जीपणा आणि दिरंगाई बाब जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रत्ना रावखंडे यांच्याकडून समाधानकारक उत्तरे मिळाले नाही.

ही गंभीर परिस्थिती 
जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती गंभीर असतांना जिल्हा रुग्णालयाकडून होत असलेल्या दिरंगाई बाबत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी बैठकीनंतर तातडीने आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी संपर्क करून ही गंभीर परिस्थिती त्यांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर तासाभरातच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रत्ना रावखंडे यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT