Postal department staff checking before sending Diwali snacks abroad esakal
नाशिक

Diwali 2023: टपालाने फराळाचा दरवळला सुगंध! अमेरिका, ऑस्ट्रेलियाला सर्वाधिक पार्सल; 17 दिवसांत 3 कोटींचा महसूल

- युनूस शेख

जुने नाशिक : टपाल विभागाच्या पार्सल सेवेमुळे १०० हून अधिक देशांमध्ये दिवाळी फराळाचा सुगंध दरवळत आहे. गेल्या १७ दिवसांपासून टपाल विभागाने फराळ पार्सल सेवा उपलब्ध करून दिली.

दैनंदिन सुमारे दोन लाखांप्रमाणे शुक्रवार (ता. १०)पर्यंत सुमारे तीन कोटी चार लाख रुपयांचा महसूल विभागास प्राप्त झाला आहे. (Diwali 2023 fragrance of Faral by indian post Most parcels to America Australia 3 crore revenue in 17 days nashik)

शहर-जिल्ह्यातील अनेक हिंदू बांधव शिक्षण आणि नोकरीनिमित्त जगाच्या विविध देशांमध्ये वास्तव्यास आहेत. काही कारणांमुळे यातील बहुतांश बांधवांना दिवाळीत मायदेशी परतणे शक्य होत नाही.

कुटुंबाची माया, प्रेमस्वरूप दिवाळी, फराळास मुकावे लागत असते. अशी वेळ येऊ नये, यासाठी विदेशात असलेल्या बांधवांना टपाल पार्सल सेवेच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत फराळ पोचविला जातो. कोरोना काळातील दोन वर्षे आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद ठेवण्यात आली होती.

त्यामुळे दिवाळी फराळास विदेशातील बांधवांना मुकावे लागले होते. गेल्या वर्षी परिस्थिती काहीशी सामान्य झाल्याने २० देशांमध्ये फराळाचा सुगंध दरवळला होता.

यावर्षी त्यात वाढ होऊन १०० हून अधिक देशांमध्ये फराळाचा सुगंध दरवळला आहे. ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका या देशांमध्ये सर्वाधिक फराळाचे पार्सल पोहोच झाले आहेत. त्यामुळे विदेशातील बांधवांना फराळाचा आस्वाद घेण्याचा आनंद मिळाला.

नाशिक विभागातून दररोज ५०, तर शहरातील जीपीओ टपाल कार्यालयातून २० पार्सल बुक होत आहेत. यातून प्रतिदिन दोन लाख उत्पन्न मिळते.

गेल्या १७ दिवसांत तीन कोटी चार लाख उत्पन्न मिळाले. यासाठी टपाल विभागाकडून डाकघर निर्यात केंद्र असे विशेष काउंटर उपलब्ध करून देण्यात आले आहे.

यावर आहे बंदी

सुरक्षा कारणास्तव काही वस्तू, पदार्थ पार्सल करण्यास बंदी घातण्यात आली आहे. ज्वलनशील वस्तू, द्रवपदार्थ तसेच इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा बंदी घालण्यात आलेल्या वस्तू, पदार्थांमध्ये समावेश आहे.

पार्सलमध्ये या वस्तू जाऊ नये. तसेच, सुरक्षेच्या कारणास्तव पार्सल तपासणी करून पॅकिंग केले जात आहे. त्यासाठी टपाल विभागाकडून पॅकिंगसाठी विशेष बॉक्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

दिवाळी फराळास या देशांतील बांधव मुकणार

दोन देशांमध्ये सुरू असलेली युद्ध आणि सुरक्षा कारणास्तव चार देशांची पार्सल सेवा टपाल विभागाकडून बंद करण्यात आली आहे.

इस्राईल आणि युक्रेन याठिकाणी सुरू असलेले युद्ध तसेच चीन आणि पाकिस्तान देशाशी सुरक्षा कारणास्तव येथील पार्सल सेवा बंद करण्यात आली. त्यामुळे या चारही देशांतील हिंदू बांधव यंदाही दिवाळी फराळास मुकणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

स्मृतीच्या वडिलांनंतर पलाश मुच्छलचीही प्रकृती बिघडली, रुग्णालयात घेतले उपचार

सांगलीत ड्रंक अँड ड्राइव्हचा थरार! राँग साइडने चालवली स्कोडा, ६-७ वाहनांना धडक; अनेकजण जखमी

दुर्दैवी घटना! 'शेतीत मशागत करताना रोटरमध्ये अडकून शेतकऱ्याचा मृत्यू'; कागल तालुक्यातील घटना, अचानक तोल गेला अन्..

CM Eknath Shinde: आमचा शत्रू फक्त महाविकास आघाडीच: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे; स्थानिकमध्ये एकमेकांविरुद्ध लढलो म्हणजे शत्रू नाही

Crime News : पुण्यात घरफोडी करणारी तरुणींची टोळी, विदर्भातून सहा जणींना घेतलं ताब्यात; VIDEO झालेला व्हायरल

SCROLL FOR NEXT