Citizens buying vehicles on the occasion of Lakshmi Pujan in Diwali esakal
नाशिक

Diwali Shopping : यंदाचा दिवाळी सण दणक्यात; वाहनबाजार, होमअप्लायन्सेस, ज्वेलरीत बूम

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे दिवाळी सणाच्या आर्थिक उलाढालीवर संकट ओढावले होते. मात्र, पावसाची उघडीप अन्‌ थंडीची चाहूल लागल्याने लक्ष्मीपूजनाच्या शुभमुहूर्तावर यंदाची दिवाळीत दणक्यात आर्थिक उलाढाल झाली. वाहन बाजार, गृहपयोगी वस्तू अन्‌ सोन्या-चांदीच्या बाजारामुळे नाशिकच्या बाजारपेठेत सुमारे ४०० ते ५०० कोटींची आर्थिक उलाढाल झाली. (Diwali festival 2022 Boom in auto market home appliances jewellery nashik news)

दोन वर्षे कोरोनामुळे सण-उत्सवांवर निर्बंध होते. यंदा कोरोनामुक्त दिवाळी साजरा होत असल्याने बाजारपेठांमध्येही चैतन्य पसरले. मात्र, गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे बाजारपेठांवर मंदीचे सावट आले होते. मात्र, दोन दिवसांत पावसाने उघडीप दिलीच, शिवाय थंडीची चाहूल लागल्याने बाजारपेठांमध्येही चैतन्य पसरले. त्यातच, कामगार वर्गाला खरेदीसाठी मिळालेली उसंत, कांदा-टोमॅटोला चांगला बाजारभाव मिळत आहे. त्याचा सकारात्मक परिणाम बाजारपेठांतील आर्थिक उलाढालीवर दिसून आला.

अनेक वाहनांसाठी वेटींग

गुढीपाडवा, अक्षयतृतीया, दसरा आणि दिवाळी सणांच्या शुभमुहूर्तावर वाहन खरेदीकडे कल असतो. गेल्या दोन वर्षांत कोरोनामुळे वाहन बाजारावर मंदीचे सावट होते. यंदा मात्र कोरोनामुक्त वातावरणात दिवाळी उत्साहात साजरी होत आहे. चांगला पाऊस झाल्याने शेतमालाला चांगला बाजारभाव असल्याने शेतकऱ्यांच्या हाती पैसा आला आहे. त्याचा थेट परिणाम वाहन बाजारावर झाला आहे.

शेतमाल वाहतूक करणारे पिकअप वाहनांना सर्वाधिक मागणी नोंदविण्यात आली आहे. तर प्रवासी वाहनांमध्ये महिंद्राच्या एक्सयुव्ही या वाहनाला कुटुंबियांकडून पसंती मिळत आहे. पिकअप वाहनांसाठी ज्यांनी दोन ते तीन आठवड्यांपूर्वी नोंदणी केली, त्यांना दिवाळीच्या शुभमूहुर्तावर वाहनाचा ताबा मिळत आहे, अन्यथा किमान दोन ते तीन आठवड्यांची वेटींग आहे.

त्याचप्रमाणे, चारचाकी वाहनांसाठीही तत्काळ ताबा नसून किमान महिनाभराची वेटिंग असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. वाहनचालकांची सर्वाधिक पसंतीचे वाहन असलेल्या स्कॉर्पिओ -१ या वाहनासाठी वितरकांकडे किमान दोन वर्षांची वेटींग आहे, तर ७०० साठी किमान दीड वर्षांची वेटींग आहे. असे असले तरी, दिवाळीच्या मुहूर्तावर वाहन बाजारात दोन वर्षांनी तेजी अनुभव असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली.

"चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साह असतो. शेतकऱ्यांची हाती पैसा आला, तरच चारचाकी वाहन बाजारात तेजी असते. यंदा चांगला पाऊस आणि शेतीमालाचा चांगला बाजारभाव मिळत आहे. कर्मिशियल वाहनांना मागणी वाढली आहे."

-शिवजी पांडे, व्यवस्थापक, भाविन व्हील्स, त्र्यंबक रोड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SL vs AUS : पथूम निसंका पहिला शतकवीर! श्रीलंका Super 8s मध्ये, ऑस्ट्रेलियाचे नशीब 'आयर्लंड'च्या हाती; जाणून घ्या समीकरण

Surya Grahan 2026: वर्षातील पहिले सूर्यग्रहण 'या' 3 राशींसाठी ठरु शकते धोकादायक, 'हे' उपाय करा नाहीतर होईल मोठी हानी!

Muhammad Yunus Resigns : मुहम्मद युनूस यांनी बांगलादेशच्या अंतरिम सरकारच्या मुख्य सल्लागारपदाचा दिला राजीनामा!

Mani Shankar Aiyar : ‘’मी गांधीवादी, नेहरूवादी, राजीववादी आहे, पण राहुलवादी नाही’’ ; काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर थेटच बोलले..!

Pune Shivjayanti : रस्त्याच्या कामामुळे शिवजयंती मिरवणूक मार्गात बदल; महापौरांचे आदेश

SCROLL FOR NEXT