making of lanterns esakal
नाशिक

Diwali Festival 2022 : रंगबिरंगी आकाशकंदीलाने बाजारपेठ उजळली

सकाळ वृत्तसेवा

जुने नाशिक : दिवाळीनिमित्त शहरभरात आकाशकंदील तयार करण्याच्या कामास जोर आला आहे. तर दुसरीकडे बाजारपेठदेखील रंगबिरंगी आकाश कंदीलने उजळून निघाली आहे. दिवाळीत घरासमोर आकाशकंदील लावण्याची परंपरा वर्षानुवर्षे चालत आलेली आहे. आधुनिक, ऑनलाइन काळातही आकाशकंदीलचे महत्त्व आजही कायम आहे. (Diwali Festival 2022 Colorful sky lanterns light up market Nashik Latest Marathi News)

दिवाळीची चाहूल लागली की आकाशकंदील तयार करण्याच्या कामास सुरवात होते. काळानुरूप आकाशकंदीलचे स्वरूप बदलले असले तरी संकल्पना मात्र जुनीच आहे. त्यामुळेच शहरभरात विविध ठिकाणी आकाशकंदील तयार करण्याचे काम आणि विक्री जोरात सुरू आहे. बाजारात विविध प्रकारच्या आकाश कंदीलचे दुकाने सजली आहे. आकाशकंदील तयार करण्याच्या उत्पादनात सुमारे ४० ते ५० टक्के वाढ झाली आहे.

होलसेल विक्रेत्यांपेक्षा घाऊक (किरकोळ) विक्रेत्यांकडे आकाशकंदीलची मागणी वाढली आहे. त्या विक्रेत्यांकडून आकाशकंदील तयार करणाऱ्यांकडे मागणी वाढल्याने उत्पादकांनी समाधान व्यक्त केले आहे. बाजारात वीस रुपयांपासून, तर आठ हजार रुपयांपर्यंत आकाशकंदील विक्रीस आहे. पाचशे रुपयांच्या आत किमतीचे आकाशकंदील खरेदीकडे नागरिकांचा अधिक कल असेल, अशी माहिती विक्रेत्यांकडून देण्यात आली.

मिळाला रोजगार

आकाशकंदील तयार करणे आणि विक्री करणे, यातून अनेकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. छोटे, मोठे असे तीन ते चार हजार विक्रेते आहे. त्यांच्याकडे सुमारे एक हजार ते पंधराशे कामगार आहे. त्याचप्रमाणे आकाशकंदील तयार करणाऱ्या त्यांच्याकडील कारागीर असे सुमारे १ हजार कारागीर तसेच आकाशकंदील तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्चामाल विक्रीचे विक्रेते अशा सुमारे चार हजारांपेक्षा अधिक व्यक्तींना रोजगार उपलब्ध झाला आहे.

आकाशकंदीलासाठी लागणारे साहित्य

पारंपारिक आणि इको फ्रेंडली आकाश कंदीलकडे नागरिकांचा कल आहे. पारंपरिक कंदीलसाठी बांबूच्या कांबट्या, जिलेटिन प्लास्टिक कागद, साधा प्लॅस्टिक कागद व चमकी यांचा वापर होत असतो. तर इको फ्रेंडली आकाशकंदील तयार करताना कागदी पुट्टा, लाकूड, बारदान, वेलवेट, फर कापड, लोकर, ट्रेसिंग पेपर, तार यांचा वापर होत असतो. पुठ्यापासून तयार केलेले, लाकूड आणि कापडाचे, कागदापासून तयार केलेले झोपडी कंदील,
तोरण कंदील, करंजी कंदील, हंडी कंदील, झुंबर कंदील, पारंपारिक षटकोनी कंदील असे प्रकार आहेत.

"यंदा नागरिकांमध्ये उत्साह अधिक आहे. बहुतांशी आकाशकंदील तयार झाले आहे, प्रतीक्षा आहे ती केवळ मागणीचे विक्रीत रूपांतर होण्याची. नागरिकांचे वेतन आणि बोनस यावर खरेदी- विक्री अवलंबून आहे. यंदा मागणी वाढण्याची शक्यता आहे." - नम्रता परदेशी, विक्रेता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

मध्यपूर्वेत तणाव वाढला, पुन्हा युद्धाला सुरुवात! अमेरिकेकडून १४० हून अधिक ठिकाणांवर हल्ले, इराणचंही प्रत्युत्तर...

INDW vs ENGW Test: जे सचिन, विराटला नाही जमलं, ते पोरीनं करून दाखवलं! यास्तिका भाटीयाने लॉर्ड्स कसोटीत इतिहास घडवला

Ashadhi Wari Accident Aid: आषाढी वारीतील अपघाती मृत्यू प्रकरणी चंद्रपूरच्या वारकऱ्याच्या वारसांना ४ लाखांची मदत; विठ्ठल रखुमाई वारकरी योजना २०२५ अंतर्गत मंजुरी

Latest Marathi News Update: सटाण्यात रोटरी क्लबचा पदग्रहण सोहळा उत्साहात

SCROLL FOR NEXT