Diwali Festival Shopping Crowd esakal
नाशिक

Diwali Festival 2022 : दिवाळी खरेदीसाठी शहरात गर्दीच गर्दी!

सकाळ वृत्तसेवा

जुने नाशिक : रविवारच्या सुट्टीचे औचित्य साधत दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी उसळली होती. कपड्यांच्या दुकानावर सर्वाधिक गर्दी बघावयास मिळाली.

अवघ्या आठ दिवसांवर दिवाळी येऊन ठेपली आहे. शाळेंना सुट्ट्या लागल्या आहेत. त्यात दिवाळीपूर्वीचा शेवटचा रविवार आल्याने सुट्टीचे औचित्य साधत नागरिकांनी बाजारपेठेत नवीन कपड्यांसह विविध वस्तु खरेदीसाठी बाजारात मोठी गर्दी झाली होती. जणू जनसागर उलटल्याचे चित्र मेन रोड, शालिमार बाजारपेठेत दिसून आले. दुकानदारांनी सकाळी लवकरच दुकाने उघडल्या होत्या. विशेष करून रेडिमेड कपडे, लहान मुलांच्या कपड्यांच्या दुकानात अधिक गर्दी दिसली. (Diwali Festival 2022 Crowd in city for Diwali shopping Nashik Latest Marathi News)

यामुळे विविध व्यवसायिकांनी समाधान व्यक्त केले. दोन वर्ष कोरोना प्रादुर्भावामुळे अतिशय साध्या पद्धतीने दिवाळी साजरी झाली. त्यामुळे व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले होते. यंदा निर्बंधमुक्त दिवाळी उत्साहात साजरी होईल, अशी आशा व्यवसायिकांना आहे. त्यास साजेशे चित्र बाजारात दिसून आले.

मेन रोड, शालिमार, दहिपूल परिसरात कपडे, पादत्राणे, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिक वस्तू खरेदीसाठी, तर कानडे मारुती लेनमध्ये घराची सजावटीसाठी वस्तू खरेदीसाठी गर्दी झाली होती. गर्दीतून दुचाकी, तीनचाकी वाहने मार्गक्रम करीत असल्याने नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागले. दोन वर्षांनंतर यंदाची दिवाळी उत्साहात साजरी करण्यास मिळत आहे, हा आनंद त्यांना समस्यांकडे दुर्लक्ष करण्यास भाग पाडत होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Privatization: 'ही' सरकारी बँक होणार खासगी! कधीही घोषणा होण्याची शक्यता, निर्णय अंतिम टप्प्यात

"कोण हिंदू? कोण मुस्लिम?" धर्माच्या भिंती ओलांडून 'बाप्पा' पाकिस्तानात! मूर्ती घडवतानाचा व्हिडिओ होतोय व्हायरल; Viral Video

रितेश देशमुखने पापाराझीकडून चक्क १०० रुपये उधार घेतले, पण का? अभिनेत्याने सांगितलं रस्त्यावर काय घडलं, म्हणाला-

Duleep Trophy Final: कर्णधार ईशान किशन पुन्हा चमकला, पण शतक थोडक्यात हुकलं; पडिक्कलनं घेतला शानदार कॅच; Video

Baramati Crime : बारामतीत छळाला कंटाळून विवाहितेने संपविले जीवन; पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT