rangolis are drawn in the courtyards and lanterns are lit. Women celebrating Diwali esakal
नाशिक

Diwali Festival 2022 : दिवाळीला मोठ्या उत्‍साहात सुरवात

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : वर्षातील सर्वात मोठा सण असलेल्‍या दिवाळीला शुक्रवारी (ता. २१) मोठ्या उत्‍साहात सुरवात झाली. वसुबारसनिमित्त सकाळी महिला वर्गाने गाय- वासराचे विधिवत पूजन करत कृतज्ञता व्‍यक्‍त केली. शनिवारी (ता.२२) धन्‍वंतरी जयंतीला आरोग्‍य देवतेची उपासना केली जाणार आहे. (Diwali Festival 2022 Diwali begins with great enthusiasm in city Nashik Latest Marathi News)

गेल्‍या काही दिवसांपासून दिवाळी सणाच्‍या तयारीची लगबग शहर परिसरात बघायला मिळत होती. स्‍वच्‍छतेपासून खरेदीचा उत्‍साह नाशिककरांमध्ये बघायला मिळत होता. बहुप्रतिक्षित दीपोत्सवच्‍या सणाला शुक्रवारी धुमधडाक्‍यात सुरवात झाली. चिमुकल्‍यांकडून सकाळी फटाक्‍यांची आतषबाजी करताना आनंद लुटला. सकाळच्‍या वेळी महिलांनी बसुबारसचे औचित्‍य साधताना गाय-वासरांची पूजा केली.

त्यामुळे तपोवन भागातील गोशाळा तसेच पंचवटी, निमाणी भागातील पांजरपोळ येथे गायींच्‍या पूजनासाठी महिला वर्गाची गर्दी झालेली होती. सायंकाळी‍ रोषणाईने इमारती उजळल्‍या होत्‍या. दरम्‍यान शनिवारी (ता. २२) धन्‍वंतरी पूजन केले जाणार आहे. आरोग्‍य देवतेची पूजा करताना मंगलमय आरोग्‍याची प्रार्थना यानिमित्त केली जाणार आहे.

तर रविवारी (ता. २३) धनत्रयोदशीनिमित्त सोने-चांदी व अन्‍य वस्‍तूंच्‍या खरेदीचे नियोजन नाशिककरांनी आखले आहे. सोमवारी (ता.२४) लक्ष्मीपूजनानिमित्त व्यवसाय, उद्योगासह घराघरांत देवी लक्ष्मीचे पूजन केले जाणार आहे.

अमाप उत्‍साहाचे वातावरण

घरातील चिमुकल्‍यांपासून तर ज्‍येष्ठांपर्यंत सर्वांमध्ये उत्‍साहाचे वातावरण बघायला मिळत आहे. बाजारपेठेत खरेदीचा उत्‍साह कायम बघायला मिळाला. रात्री उशिरापर्यंत बाजारपेठा ग्राहकांनी गजबजल्‍या होत्‍या. आता अंतिम टप्यांत पूजाविधीचे साहित्‍य खरेदीची लगबग बघायला मिळते आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: ''तुम्ही बंजारा समाजासारखे दिसत नसतानाही आरक्षण का खाल्लं?'', धनंजय मुंडेंना उद्देशून जरांगेंचं मोठं विधान

अडीच वर्षांपूर्वी विवाह, पतीसह सासरच्यांकडून छळ; पोलिसाच्या पत्नीनं तिसऱ्या मजल्यावरून उडी घेत संपवलं जीवन, दिरानं रुग्णालयात नेलं, पण...

IND vs WI 1st Test Live: अरे आताच फिफ्टी झाली होती, कशाला घाई केली! Shubman Gill चा चुकीचा फटका अन् विंडीजला मिळाली विकेट

Crop Loss: पिकेच झाली उद्‍ध्वस्त, खत देणार कशाला? नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे ७० हजार टनांहून अधिक साठा पडून

Layoff 2025: अमेरिकन कंपनीचा धक्कादायक निर्णय; 4 मिनिटांच्या कॉलमध्येच भारतीय कर्मचाऱ्यांना कामावरुन काढलं

SCROLL FOR NEXT