Diwali Festival News esakal
नाशिक

Diwali Festival : आमदारांना स्थानिक विकास निधीतून 80 लाखांच्या निधीचे Diwali Gift

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : दिवाळीच्या धामधुमीत शिधापत्रिकाधारकांना रेशन कार्डवर आनंदाचा शिधा दिला जात असतानाच राज्य सरकारने सर्व आमदारांना खूष करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्यातील सगळ्या आमदारांना ८० लाखांच्या निधीचे गिफ्ट दिले आहे.

दिवाळीनिमित्त स्थानिक विकास निधीतून विकास कामांसाठी देण्यात येणाऱ्या गिफ्टमधून आमदारांना खूष करण्याचा हा प्रयत्न राज्याच्या तिजोरीवर मात्र २२९ कोटी रुपयांचा बोजा टाकणार आहे. आमदारांचा २५१५ या लेखाशीर्षांतर्गत निधीतील मूलभूत सुविधांची कामे रद्द केल्यानंतर हा निधी वितरित करून दिलासा देण्याचा प्रयत्न आहे.(Diwali Festival News Diwali Gift of 80 Lakhs from Local Development Fund to MLA Nashik News)

राज्यात २८७ विधानसभेचे तर ६३ विधानपरिषद सदस्य आहेत. या सर्व आमदारांना स्थानिक विकास निधीतील निधी मंजूर केला असून त्यासाठी राज्याच्या तिजोरीवर १४६८ कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. एकावेळी एवढ्या मोठ्या निधीचा बोजा पडू नये म्हणून प्रत्येक महिन्याला दहा टक्के निधी वितरित करण्याचे धोरण ठरवण्यात आले आहे.

यापूर्वी सरकारने मे -जून -ऑगस्टपर्यंतच्या निधीचे वितरण दिले असून दिवाळीच्या काळात सप्टेंबर व ऑक्टोबर या दोन महिन्यांचा निधी वितरित केला. प्रत्येक आमदाराला ८० लाख रुपये निधी वितरित करण्यात आला आहे. सत्तांतर झाल्यानंतर मागील चार महिन्यांपासून सर्व कामांवर स्थगिती लावण्यात आली आहे.

जिल्हा वार्षिक योजनांवरील स्थगिती उठवली असली, तरी अद्याप त्याचे नियोजन झालेले नाही. तसेच एप्रिल २०२१ नंतर मंजूर केलेल्या निधीवरील स्थगिती कायम आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी ग्रामविकास मंत्रालयाने मूलभूत सुविधांसाठी मंजूर केलेल्या व वर्क ऑर्डर न दिलेली सर्व कामे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे महाविकास आघाडीतील आमदारांना फटका बसल्याची नाराजी असतानाच, सरकारने आमदारांना प्रत्येकी ८० लाख रुपये निधी वितरित केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Phaltan Politics:'फलटण पालिकेवर शिवसेनेचा झेंडा फडकणार'; राजे गट अन् शिवसेनेचे पदाधिकाऱ्यांचा एकदिलाने लढवण्याचा निर्धार..

माेठी बातमी! 'फलटण तालुक्यातील दाेन केमिकल कंपन्यांना भीषण आग'; सव्वाआठ कोटींचे नुकसान, पळापळी अन् काय घडलं !

Latest Marathi News Live Update : मालेगावातील भीषण घटनेच्या निषेधार्थ पाचोडमध्ये आक्रोश मोर्चा!

Kagal crime News: शेतजमिनीच्या वादातून वृद्धाला आणि एका महिलेला मारहाण, या दोन परस्‍परविरोधी तक्रार कागल पोलिस ठाण्यात दाखल

Satara fraud:'कार विकून अनेकांना गंडा घालणाऱ्यांना अटक'; बनावट कागदपत्रांद्वारे सांगली, कोल्हापूर, निपाणी आदी ठिकाणी व्यवहार

SCROLL FOR NEXT