Vechile Theft News esakal
नाशिक

Nashik Crime Update : वाहन चोरांची दिवाळी सुरूच; आठवडाभरात 20च्या आसपास दुचाकी चोरी

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शहरात वाहन चोरीची मालिका सुरूच असून वेगवेगळ्या भागात पार्क केलेल्या तीन दुचाकी चोरी झाल्या. याप्रकरणी अंबड, उपनगर आणि नाशिक रोड पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दिवाळीत नवीन वाहन खरेदी करण्याची प्रथा आहे. नवीन वाहन खरेदीत नागरिक व्यस्त असताना चोरट्यांकडून मात्र नागरिकांच्या वाहनावर डल्ला मारला जात आहे. आठवडाभरात वीसच्या आसपास दुचाकी चोरी झाल्या. दोन दिवसात शहरात सिडको, उपनगर आणि नाशिक रोडला सिन्नर फाटा परिसरात दुचाकी चोरीच्या घटना उघडकीस आल्या.

सिडकोतील विकास मच्छींद्र धबडगे (रा. उत्तमनगर) यांची दुचाकी (एमएच- १५- एचके- ९६८४) २६ ऑक्टोबरला रात्री घरासमोर चोरी झाली. दुसरी घटना गांधीनगर भागात घडली. शैलेंद्र यादव (रा. पंचशीलनगर) या युवकाची दुचाकी (एमएच- १५- डीए- १८८२) ९ ऑगस्टला रात्री त्यांच्या घरासमोरून चोरून नेली. (Diwali of vehicle thieves continues Around 20 bike theft in a week Nashik Crime News)

तिसरी घटना सिन्नर फाटा भागात घडली. किरण बाळासाहेब गायधनी (रा. पळसे) यांनी तक्रार दाखल केली आहे. गायधनी बुधवारी (ता.२) सिन्नर फाटा भागात आले होते. निसर्ग लॉन्स परिसरात त्यांची अ‍ॅक्टिव्हा (एमएच- १५- एफझेड- ३१९१) पार्क केली असता चोरट्यांनी पळवून नेली.

कारच्या काचा फोडून चोऱ्या

वाहन चोरीशिवाय पार्किंगमधील वाहनांच्या काचा फोडून चोरीचे फंडे सुरू झाले आहेत. कॉलेज रोडवर शुक्रवारी (ता. ४) सोसायटी पार्किंगमध्ये लावलेल्या दोन कारच्या काचा फोडून चोरट्यांनी रोकड, लॅपटॉप आणि महत्त्वाच्या कागदपत्रांसह सव्वा लाखाचा ऐवज लांबविला. प्रवीण प्रभाकर देशमुख (रा. पोखरण रोड, ठाणे) कामानिमित्त शहरात आले आहेत.

शुक्रवारी दुपारी त्यांची कार (एमएच- ४३- एएफ- ५८१२) कॉलेज रोड येथील कीर्ती सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावली होती. चोरट्यांनी त्यांच्या कारच्या खिडकीची काच फोडून लॅपटॉप, ब्ल्यू ट्रूथ स्पीकर, वायरलेस माऊस, पाकिटातील साडेचार हजार रुपयांची रोकड आणि महत्त्वाची कागदपत्र असा सुमारे ८६ हजाराचा ऐवज चोरून नेला. तेथूनच काही अंतरावर कृषिनगर भागात एचपीटी कॉलेज पाठीमागे पार्क केलेली कारमधून (एमएच- १५- एफटी- ५४९४) लॅपटॉप, बँकेची आणि महत्त्वाची कागदपत्र, असा ३० हजाराच्या ऐवजावर चोरट्यांनी डल्ला मारला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Tariff : डोनाल्ड ट्रम्प यांचा जपान अन् दक्षिण कोरियाला मोठा धक्का! ; २५ टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा

Modi Government and Farmers : शेतकऱ्यांसाठी GOOD NEWS! ; कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली मोठी माहिती, 'आता लवकरच...'

Pachod News : शिक्षकांना चक्क विद्यार्थ्यांच्या गणवेषाचीही हवीय टक्केवारी; शिक्षकाने केली पुरवठादाराकडे टक्केवारीची मागणी

Nationwide strike : मोठी बातमी! देशभरात तब्बल २५ कोटी कर्मचारी संपावर जाणार; सर्वसामान्यांना कोणत्या कामांमध्ये फटका बसणार?

ENG vs IND, 3rd Test: लॉर्ड्स कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग-११ मध्ये बदल निश्चित! बुमराहसाठी 'या' खेळाडूला डच्चू मिळणार?

SCROLL FOR NEXT