Diwali shopping esakal
नाशिक

Diwali Update : दिवाळी खरेदीसाठी बाजारपेठेत जाताना जरा सावधान

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : गेल्या दोन वर्षांपासून गावठाणातील रस्त्या खोदून ठेवल्याने तेथील नागरिकांना होणाऱ्या मानसिक त्रासाची झलक सर्व नाशिककरांना दिवाळीत पाहायला मिळणार आहे. त्याला कारण म्हणजे अद्यापही ९७ रस्त्यांची कामे अपूर्ण असून, तातडीने म्हणजे मार्चअखेरपर्यंत कामे करण्याच्या सूचना स्मार्टसिटी कंपनीने दिल्या आहेत.

त्यामुळे गावठाणात वसलेल्या बाजारपेठेत दिवाळीत खरेदीसाठी जाणाऱ्या नागरिकांना मोठ्या मानसिक त्रासाला सामोरे जावे लागणार असून, यानिमित्ताने पुढील काही दिवस वाहतुकीचे नियोजन करावे लागणार आहे.

स्मार्टसिटी कंपनीकडून गावठाण पुनर्विकासाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्याअंतर्गत गावठाणातील रस्ते सिमेंटकाँक्रिटचे करून त्यात पुन्हा खोदाई होऊ नये, यासाठी टेलिफोन, वीज, इंटरनेट केबल त्याचबरोबर पाणीपुरवठा व ड्रेनेज लाइन टाकण्याचे काम सुरू आहे. परंतु त्यासाठी मोठ्या प्रमाणात रस्ते खोदून ठेवण्यात आले आहे.

एकूण १६७ रस्ते खोदण्याचे नियोजन होते. सुरवातीला वर्षभरात कामे पूर्ण करण्याच्या सूचना होत्या; मात्र अद्यापही ती कामे झालेली नाही. स्मार्टसिटी कंपनीने नुकत्याच घेतलेल्या आढाव्यात १६७ पैकी ७० रस्त्यांची कामे पूर्ण झाली. ९७ रस्त्यांची कामे अद्यापही अपूर्ण आहे.(Diwali Update Be Careful about do diwali shopping Nashik News)

त्यामुळे येत्या दिवाळीत बाजारपेठेत खरेदी करण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून गावठाण भागात राहणारे नागरिक मानसिक त्रास सहन करत आहेत. आता रस्त्यांची कामे पूर्ण न झाल्याने जवळपास सर्वच नाशिककरांना कमी-अधिक प्रमाणात खोदलेल्या रस्त्यांचा त्रास सहन करावा लागणार आहे.

दोन वर्षांत झाले नाही ते सहा महिन्यांत कसे?

स्मार्टसिटी कंपनीकडून गावठाण भागातील कामांचा आढावा घेण्यात आला. त्यात १६७ रस्त्यांपैकी ७० रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. अद्यापही ९७ रस्त्यांची कामे अपूर्ण आहेत. त्यामुळे या रस्त्यांची कामे एप्रिल २०२३ पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना स्मार्टसिटी कंपनीकडून देण्यात आल्या आहेत. मात्र, जी कामे यापूर्वी दोन वर्षांत झाली नाही ती सहा महिन्यांत कशी होणार, असा सवाल गावठाण भागातील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. जर सहा महिन्यांत रस्त्याचे कामे पूर्ण होत असतील तर कामाची गुणवत्ता राहणार का, असेदेखील विचारले जात आहे.

जुने नाशिक व पंचवटी भागातील अपूर्ण राहिलेल्या रस्त्यांचे कामे पूर्ण करण्यासाठी सात महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे.

- सुमंत मोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्टसिटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

H-1B व्हिसावर ट्रंप प्रशासनाचा मोठा निर्णय; अमेरिकेत काम करणाऱ्या भारतीयांना बसणार मोठा फटका?

India vs Brazil Football: भारताविरुद्धच्या सामन्यासाठी ब्राझीलचा संघ जाहीर; व्हिनिशियस, राफीन्हा यांचीही ऐतिहासिक लढतीसाठी निवड

Maratha Reservation: ‘मुंबईला जाणारच’; १२ सप्टेंबरच्या बैठकीत कूचची तारीख ठरणार, मनोज जरांगेंचा निर्धार; भाऊबिजेला अमृता फडणवीसांच्या घरी जाणार

MPSC Exam: एमपीएससी परीक्षार्थींसाठी मोठी अपडेट; गट-क पूर्व परीक्षा पुढे ढकलली, आता ३ जानेवारीला होणार परीक्षा

Nagpur Weather: विदर्भाला उकाड्यापासून मिळणार दिलासा; शुक्रवारनंतर जोरदार पाऊस, तीन जिल्ह्यांना यलो अलर्ट

SCROLL FOR NEXT