DJ Operator Pappu Bendkule
DJ Operator Pappu Bendkule esakal
नाशिक

Electric Shock Death : आडगावला DJ Operatorचा शॉक लागून मृत्यु

नरेश हाळणोर

नाशिक : दांडिया खेळण्यातून झालेल्या वादातून युवकाचा खून झाल्याची घटना घडलेली असताना दुसरीकडे आडगाव परिसरात दांडिया महोत्सवात डीजे वाजविताना झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे इलेक्ट्रिक शॉक लागून डीजे ऑपरेटर युवकाचा दुर्दैवी मृत्यु झाल्याची घटना मंगळवारी (ता.४) रात्री घडली. दोन्ही घटना या नवरात्रोत्सवाच्या अखेरच्या दिवशी घडल्याने हळहळ व्यक्त होते आहे.

आडगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पप्पु अरुण बेंडकुळे (३५, रा. आडगाव) असे इलेक्ट्रिक शॉक लागून मृत्यु झालेल्या युवकाचे नाव आहे. आडगाव परिसरात नवरात्रोत्सवानिमित्ताने दांडिया महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले होते. मयत बेंडकुळे व त्याचा मित्राचा साऊंड सिस्टिम पुरविण्याचा व्यवसाय होता. त्यांनी या मंडळाच्या दांडिया महोत्सवासाठी साऊंड सिस्टिम पुरविलेले होते. (DJ Operator died of Electric Shock in Adgaon Nashik Latest Marathi News)

मंगळवारी (ता.४) रात्री दांडियाचा कार्यक्रम सुरू होता. त्यावेळी बेंडकुळे हे साऊंड सिस्टिम असलेल्या टेम्पोकडे गेले. त्याठिकाणी पाण्याचे डबके असल्याने त्याने पायातील चप्पल काढली आणि टेमपोला असलेल्या शिडीला हात लावताच त्यास इलेक्ट्रीक शॉक बसला. यात तो गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यु झाला. याप्रकरणी आडगाव पोलिसात नोंद करण्यात आली आहे. सदरची घटना मंगळवारी (ता.४) रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली.

टेम्पोच्या शिडीला वीजप्रवाह

साऊंड सिस्टिमही बंद पडल्याने साऱ्यांनी टेम्पोकडे धाव घेतली. त्यावेळी सदरचा प्रकार समोर आला. दरम्यान सदर मंडळाने रितसर वीज वितरण कंपनीकडून तात्पुरत्या स्वरुपात वीज कनेक्शन घेतलेले होते. टेम्पोतील साऊंड सिस्टिमला इलेक्ट्रिक वायरिंग करताना त्यातूनच टेम्पोच्या शिडीला विजेचा प्रवाह उतरला असावा आणि त्यातूनच सदरची दूर्घटना घडली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT