crime news  esakal
नाशिक

Dnyandeep Gurukul Ashram Case : आश्रम सोडून गेलेल्या मुलींचीही चौकशी

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : म्हसरुळ येथील ज्ञानदीप गुरुकुल आश्रमातील सहा मुलींवरील अत्याचाराच्या घटनेने राज्यभर खळबळ उडाली आहे. त्यातच, राज्याच्या समितीकडून चौकशी होणार आहे. दरम्यान, आश्रमातून बाहेर पडलेल्या एका मुलीने संपर्क साधून अत्याचार झाल्याचे पोलिसांना सांगितल्याचे समजते. मात्र याबाबत अद्याप तक्रार दाखल झालेली नाही.

तर, पोलिसांकडूनही आश्रमातून या घटनेपूर्वीच बाहेर पडलेल्या मुलींचा शोध घेऊन चौकशी करण्याबाबतचे संकेत दिले आहेत. तसेच, नराधम संस्थाचालक हर्षल मोरे याच्याकडून अत्याचार झाला असल्यास संबंधितांनी पोलिसांशी संपर्क साधण्याचेही आवाहन करण्यात आले आहे. (Dnyandeep Gurukul Ashram rape Case Investigation of girls who left ashram Nashik crime news)

संशयित नराधम हर्षल बाळकृष्ण मोरे (वय ३२) याने मानेनगरमध्ये सुरू केलेल्या ज्ञानदीप गुरुकुल आश्रमातील अल्पवयीन पाच व एका १९ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी म्हसरुळ पोलिसात स्वतंत्र पोक्सोअन्वये बलात्कार व ॲट्रॉसिटी अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयित हर्षल मोरे याच्या पोलिस कोठडीची मुदत उद्या (ता. ३०) संपत असल्याने त्यास जिल्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे.

दरम्यान, या प्रकरणाची राज्य महिला आयोगाकडूनही दखल घेण्यात आली आहे. २०१८ पासून असलेल्या या आश्रमातून बाहेर पडलेल्या एका विद्यार्थिनीने पोलिसांशी संपर्क साधून अत्याचार केल्याचे सांगितल्याचे समजते. मात्र, या बाबत तक्रार दाखल झालेली नाही. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे. तर, पोलिसांकडूनही आश्रम सोडून गेलेल्या विद्यार्थिनींचा शोध घेऊन त्यांची चौकशी केली जाणार आहे. अत्याचार केलेल्याचे समोर आल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल, असे परिमंडळ एकचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी सांगितले.

हेही वाचा : भारतीय उत्पादनांच्या खरेदीतली वाढ बनवेल देशाला आर्थिक महासत्ता...

मोरे आज न्यायालयात

संशयित नराधम हर्षल मोरे यास बुधवारी (ता. ३०) जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले जाणार आहे. पोलिसांकडून त्याच्या वाढीव पोलिस कोठडीची मागणी केली जाण्याची शक्यता आहे. तसेच, दुसऱ्या गुन्ह्यातही अटक करून कोठडी मागितली जाण्याचीही शक्यता आहे. तसेच, मोरे यास आश्रम चालविण्यासाठी कोणा-कोणाकडून अर्थसाहाय्य मिळत होते, याचीही माहिती पोलिसांना घ्यायची आहे. आत्तापर्यंतच्या तपासात त्याने याबाबत फारशी माहिती दिली नसल्याचे समजते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Railway Station: "थोरले बाजीराव पेशवे पुणे स्टेशन… "; रेल्वे स्थानकावर झळकले बॅनर, राज्यात नवा वाद पेटला!

Latest Maharashtra News Updates : शिवरायांनी महाराष्ट्रात स्वराज्याचे संस्कार रुजवले- शाह

Ind Vs Eng: हेझलवूडचा सल्ला मानला अन् आकाश दीपनं उडवली इंग्लंडची भंबेरी, काय होतं सिक्रेट?

Kolhapur : भूत काढण्याच्या बहाण्याने बेदम चोप, भोंदूबाबाकडून प्रसादाच्या नावाने लूट; कोल्हापूर अंधश्रद्धेच्या अडकत आहे का?

Ahilyanagar Accident:'टाकळीमियाच्या दिंडीला भीषण अपघात'; पिकअपच्या धडकेत ट्रॅक्टर-ट्रॉली उलटली; नऊ वारकरी जखमी

SCROLL FOR NEXT