Dnyaneshwar Vispute Bribe Case esakal
नाशिक

Dnyaneshwar Vispute Bribe Case: लाचखोर अभियंता विसपुतेला 3 दिवसांची पोलिस कोठडी; धुळ्यातील घराची झडती सुरू

सकाळ वृत्तसेवा

Dnyaneshwar Vispute Bribe Case : पातोंडा (ता. चाळीसगाव) येथे क्लस्टर विकसित कामाचे सुमारे चार कोटी व अतिरिक्त सुरक्षा अनामत रकमेचे ३५ लाख रुपये मिळवून देण्याच्या मोबदल्यात चार लाखांची लाच स्वीकारणाऱ्या चाळीसगाव येथील उपविभागीय बांधकाम अभियंता ज्ञानेश्वर पंढरीनाथ विसपुते याला नाशिक न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

लाचखोर ज्ञानेश्वर विसपुते यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शनिवारी (ता. १६) रात्री गडकरी चौकात अटक केली. या प्रकरणी मुंबई नाका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Dnyaneshwar Vispute Bribe Case 3 day police custody for bribe taking engineer Vispute nashik bribe crime)

ज्ञानेश्वर विसपुते (वय ५७, उपविभागीय अभियंता, बांधकाम उपविभाग, चाळीसगाव, जि. जळगाव, रा. अशोकनगर, जि. धुळे) असे लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे.

शनिवारी रात्री नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. रविवारी (ता. १७) विसपुतेला न्यायालयात हजर केले असता, मंगळवार (ता. १९)पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

तक्रारदार हे ठेकेदार असून, जळगाव जिल्हा परिषदेच्या बांधकाम उपविभागांतर्गत पातोंडा (ता. चाळीसगाव) येथे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी रुरबन या शासकीय योजनेचा माध्यमातून क्लस्टर विकसित करण्याचे काम घेतले होते.

या कामाचे चार कोटी ८२ लाख रुपये तसेच अतिरिक्त सुरक्षा अनामत रक्कम ३५ लाख रुपये काढून देण्यास बांधकाम विभागाचा उपविभागीय अभियंता ज्ञानेश्वर विसपुते याच्याकडून अडवणूक केली जात होती.

तक्रारदाराकडून वारंवार पाठुपरावा करूनही विसपुते याच्याकडून अडवणूक सुरूच होती. शनिवारी विसपुते कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त नाशिकला आला असता, त्याने तक्रारदाराशी संपर्क साधून भेट घेतली.

त्या वेळी विसपुते याने पाच लाखांच्या लाचेची मागणी केली. तडजोडीनंतर चार लाख देण्याचे ठरले. विसपुते परत जाताना लाचेची रक्कम घेऊन जाणार होता. यादरम्यान तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. पडताळणी केल्यावर पथक कारवाईसाठी सज्ज होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

विसपुते शनिवारी रात्री परत धुळ्याला जाण्यासाठी निघाला असता, त्याने तक्रारदारास लाचेची रक्कम घेऊन गडकरी चौकात बोलावले होते. त्यानुसार गडकरी चौकात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचला.

विसपुते याने लाचेची रक्कम घेताच पथकाने त्यास जेरबंद केले. विसपुते याच्यासमवेत त्याची पत्नीही होती. विसपुते यास अटक करून मुंबई नाका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक स्वप्नील राजपूत करीत आहेत.

धुळ्यातील घराची झडती

लाचखोर विसपुते हा बांधकाम विभागात कार्यरत असल्यापासून सर्वाधिक सेवा धुळ्यातच केली आहे. धुळ्यातीलच अशोकनगरमध्ये तो राहावयास आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या धुळे पथकाने विसपुते याच्या घराचे झडतीसत्र सुरू केले.

चौकशीतही विसपुते याच्याकडून पुरेशी माहिती मिळत नाही; परंतु विसपुते याच्याकडून मोठे घबाड हाती लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे. विसपुते हा निवृत्तीच्या नजीक होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

Narali Purnima 2026: नारळी पौर्णिमेच्या दिवशी श्रीफळाचा 'हा' उपाय करा; मनातील २ महत्त्वाच्या इच्छा होतील पूर्ण!

SCROLL FOR NEXT