Patient with doctors & kidney stone esakal
नाशिक

Nashik : अंड्याच्या आकाराचा किडनी स्टोन काढण्यात डॉक्टरांना यश

अंबादास देवरे

सटाणा (जि. नशिक) : गेल्या काही दिवसांपासून लघवीच्या त्रासाने त्रस्त असलेल्या एका सत्तर वर्षीय वृद्धावर येथील ॲपेक्स रुग्णालयात (Apex Hospital) मुतखड्याची (Kidney Stone) यशस्वी शस्त्रक्रिया (Surgery) करण्यात आली. मुतखड्याचा त्रास झाल्यामुळे काल मंगळवारी (ता.१७) रोजी करण्यात आलेल्या शस्त्रक्रियेमुळे रुग्णाच्या मूत्राशयातून २०० ग्रॅम वजनाचा अंड्याच्या आकाराचा गोळा काढण्यात डॉक्टरांना यश आले. सध्या या वृद्ध रुग्णाची प्रकृती उत्तम असल्याचे रुग्णालयाने डॉक्टरांनी सांगितले आहे. (Doctors succeed in removing egg Sized kidney stone Nashik News)

डोंगरगाव (ता.देवळा) येथील तानाजी पानसरे (वय ७०) हे वृद्ध जेमतेम लघवी होण्याची तक्रार घेऊन येथील प्रख्यात सर्जन डॉ.किरण अहिरे यांच्या ॲपेक्स हॉस्पिटलमध्ये आले होते. यावेळी पानसरे यांची तपासणी केली असता सोनोग्राफी व एक्स-रे मध्ये डॉ.अहिरे यांना पानसरे यांच्या मूत्राशयात मोठा खडा आढळला तसेच प्रोटेस्ट ग्रंथीही वाढलेली आढळली. डॉक्टरांनी रुग्ण व नातेवाईकांना पानसरे यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करणे गरजेचे असल्याचे सांगितल्यावर ते तयार झाले.

यानंतर शस्त्रक्रिया करून पानसरे यांच्या मूत्राशयातील २०० ग्रॅम वजनाचा अंड्याच्या आकाराचा दगड व ५० ग्रॅम वजनाची प्रोटेस्ट ग्रंथी काढण्यात डॉक्टरांना यश आले. या दगडाची लांबी-रुंदी सुमारे सहा सेंटीमीटर इतकी आहे. शस्त्रक्रियेनंतर पानसरे यांची तब्येत उत्तम आहे. या शस्त्रक्रियेसाठी डॉ.किरण अहिरे यांना भूलतज्ञ डॉ.विष्णू बहिरम, डॉ.प्रवीण खैरनार, डॉ.सीमा खैरनार, डॉ.योगेश विंचू, डॉ.प्रवीण अहिरे, हिरामण गवळे, निलेश खैरनार यांनी सहकार्य केले.

"ग्रामीण भागातील गोरगरीब गरजू रुग्णांच्या सेवेसाठी रुग्णालय सुरू केले असून ज्येष्ठ सर्जन डॉ.किरण अहिरे यांनी ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली. सटाणा शहरात अशा प्रकारची शस्त्रक्रिया यशस्वी केल्यामुळे समाधान वाटते."

- डॉ. प्रवीण खैरनार, संचालक, ॲपेक्स रुग्णालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: जय शाहांकडून Lionel Messi ला टीम इंडियाची जर्सी भेट, T20 World Cup साठीही आमंत्रण; फुटबॉलचा बादशाह दिल्लीत काय म्हणाला?

Pune Fraud : "तुला 'एमबीबीएस'ला ऍडमिशन घेऊन देतो"; असं बोलून केली सव्वा कोटींची फसवणूक; पुण्यातील दोघांविरुद्ध गुन्हा दाखल!

वर्षाच्या शेवटी अमृता खानविलकरची चाहत्यांना खास भेट! 'या' बॉलिवूड अभिनेत्यासोबत वेब सीरिजमध्ये झळकणार

Pune News : नागरिक सुरक्षेसाठी मोठे पाऊल; सिंहगड रस्त्यावर 'नऱ्हे पोलिस स्टेशनचे' दिमाखात उद्घाटन!

Latest Marathi News Live Update : जायगावला साकारणार जगातील पहिले राष्ट्रीय कांदा भवन

SCROLL FOR NEXT