dastlekhak.jpg 
नाशिक

कोट्यवधींचा महसूल मिळवून देणाऱ्या 'दस्तलेखकां'कडे शासनाचे मात्र दुर्लक्षच...वाचा सविस्तर

राजेंद्र अंकार

नाशिक : (सिन्नर) जमिनी, प्लॉट, फ्लॅट आदींच्या खरेदी-विक्रीचे दस्तऐवज बनविणारे दस्तलेखक यांची मागणी वर्षानुवर्षापासून शासनदरबारी दुर्लक्षित आहे. त्यामुळे आता तरी ही मागणी शासनाने पूर्ण करत राज्यातील सर्व दस्तलेखकांना दिलासा द्यावी, अशी मागणी आता संघटनेमार्फत जोर धरत आहे. 

केवळ बसण्यासाठी जागा मिळावी ही मागणी 

नव्याने घर, जमीन किंवा मालमत्ता खरेदी करायची असते त्यांना दस्त लेखकाशिवाय पर्याय नसतो. खरेदीसाठी लागणाऱ्या विशेष स्टॅंपपासून ते कागदपत्रांची सर्व जुळवणी, नोंदणी करण्यापासूनचे सर्व काम दस्तलेखक करत असल्याने घेणार व देणार यांची सर्व प्रक्रिया सुरळित पार पडते. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून या दस्तलेखकांना बसण्यासाठी शासनाकडून जागा मिळत नसल्याने त्यांची मोठी परवड होत आहे. राज्याला नोंदणी खात्याकडून मिळणारा महसूल गेल्या वर्षीच्या तुलनेने या वर्षी जरी कमी दिसत असला तरी सध्याच्या परिस्थितीत पुन्हा व्यवहार सुरू झाले आहेत. 

त्यांच्याकडे मात्र शासन दुर्लक्षच

दुय्यम निबंधक कार्यालय सुरू झाल्यापासून ठप्प झालेले सगळे व्यवहार पूर्वपदावर येत आहे व दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये दस्त नोंदणीची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या सर्व कामांमध्ये मुद्रांक विक्रेते, दस्तलेखक हे शासनाला मदत करत आहे. परंतु मुद्रांक विक्री आणि दस्तलेखक यांच्या सुरक्षेची काळजी मात्र शासन घ्यायला तयार नाही. त्याची दखलसुद्धा शासनाने घ्यायला पाहिजे, कारण मुद्रांक विक्रेते यांना नोंदणी खात्याकडून परवाना देण्यात आलेला आहे. मुद्रांक विक्रेते हे नोंदणी खात्याशी संबंधित आहेत. त्यामुळे ते खासगी या व्याख्येत बसत नाही. परंतु शासनाला जे मोठ्या प्रमाणामध्ये महसूल मिळवून देतात त्यांच्याकडे मात्र शासन दुर्लक्ष करत आहे. 

मुद्रांक विक्री व दस्तलेखक हे नोंदणी महसूल खात्याचा आत्मा आहे. ब्रिटिश काळापासून तर आजपर्यंत ते हा व्यवसाय तहसील कार्यालयाच्या आवारात करतात व शासनाला मोठ्या प्रमाणात महसूल मिळवून देतात. परंतु त्यांना शासनाकडून पुरविल्या जाणाऱ्या सुविधा याचा मोठा अभाव आहे. - बाळासाहेब देशपांडे, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र मुद्रांक विक्रेते व दस्तलेखन महासंघ, पुणे  

संपादन - किशोरी वाघ
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahini Yojana : लाडकी बहीण योजनेतून तुमचंही नाव वगळलं नाही ना? असं करा चेक...

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : विठ्ठलवाडी मंदिरात भाविकांची गर्दी

Ghat Road Travel: पावसाळ्यात घाटातील प्रवास सुखकर बनवण्यासाठी कोणती काळजी अन् खबरदारी घ्यावी?

Video : ‘एक उडी’... अन् सगळं संपलं! स्टंटबाजी करताना इमारतीवरून पडला मुलगा, थरकाप उडवणाऱ्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ व्हायरल..

Latest Maharashtra News Live Updates: लांजा तालुक्यातील खोरनीनको धबधबा प्रवाहित

SCROLL FOR NEXT