dream watching couple 1.jpg 
नाशिक

तुमचा पार्टनर तुमच्यावर खरे प्रेम करतो का? असे ओळखा...

राजेंद्र बच्छाव : सकाळ वृत्तसेवा

नाशिक :  व्हॅलेंटाईन डे निमित्त सर्वांच्याच प्रेमाला उधाण आलेले असते..कारण हेच ते दिवस असतात..ज्या दिवशी सर्वात जास्त प्रेम व्यक्त केले जाते. पण हे दिवस वगळता तुमचा पार्टनर तुमच्यावर खरे आणि निस्सिम प्रेम करतोय का? याचा विचार कधी केला आहे का? आपल्यावर प्रेम करणारा पार्टनर असावा, तो केअरिंग असावा, तो लव्हेबल असावा..आदर करणारा असावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. प्रेमात एकमेकांवरील निस्सिम प्रेम, आदर आणि विश्वास महत्त्वाचा असतो. तर आपला पार्टनर आपल्यावर प्रेम करतो का? हे जाणायचे असेल तर या काही गोष्टींवरुन तुम्हाला कदाचित अंदाज येईल..

नो मुखवटा..!
जेव्हा कधी तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत असाल तेव्हा त्याच्या किंवा तिच्या चेहऱ्यावर कोणताही मुखवटा नसेल. तो/ती जसे आहेत तसे तुमच्यासमोर वावरतील. तुमच्या नात्याला कितीही वर्ष होऊद्या. पण ती व्यक्ती तुमच्याशी पूर्वीप्रमाणेच वागत असेल तर खऱ्या प्रेमाची ही एक पावती आहे.

तुमच्याबद्दल अभिमान
तुमच्या कामाचा, चांगल्या वागण्याचा, गुणांचा अभिमान तुमच्या पार्टनरला असायला हवा.

कुटुंबाप्रती प्रेम
जी व्यक्ती तुमच्यावर प्रेम करते ती तुमच्या कुटुंबासह तुम्हाला स्वीकारते. अशी व्यक्ती तुमच्या कुटुंबाला आणि जवळच्या मित्रपरिवारालाही जितके तुम्ही प्रेम आणि सन्मान देता तितकाच देण्याचा प्रयत्न करेल. 

तुमच्या अनुपस्थितीत तुमच्याबद्दल पॉझिटिव्ह बोलणे
जेव्हा तुम्ही सोबत नसता किंवा तुमच्या अनुपस्थितीत तो/ती नेहमी तुमच्याबद्दल बोलत असतात. मित्रांना, कुटुंबातील सदस्यांना नेहमी तुमच्याबद्दल सांगत असतात, हे देखील खऱ्या प्रेमाचे लक्षण आहे. 

सरप्राईज
सरप्राई्जेस सगळ्यांनाच आवडते. पण नेहमीच त्याची अपेक्षा आपल्या पार्टनरकडून न ठेवता तुम्ही कधीतरी त्याला/तिला एखादे सुखद सरप्राईज द्या.

सिनेमा अन् रिअल लाईफमध्ये फरक
सिनेमा पाहणे कितीही आवडीचे असले तरी त्याचा प्रभाव आपल्या आयुष्यावर कितपत असावा, याला काही मर्यादा असतात. रोमॉन्टीक सिनेमे बघून त्याप्रमाणे खऱ्या आयुष्यातही अपेक्षा करणे चुकीचे आहे.

पार्टनरची स्पेस
सतत पार्टनरच्या कामात नाक खुपसणे, सतत सूचना देणे कदाचित त्याच्या/तिच्यासाठी त्रासदायक ठरू शकते. पार्टनरलाही त्याची स्पेस द्या आणि त्याच्या पद्धतीने जगू द्या. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

१० लाख शेतकऱ्यांनी भरल पीकविमा! डाळिंबसाठी आज तर सिताफळासाठी ३१ जुलैला संपणार मुदत; ॲग्रीस्टॅक असेल तरच भरता येणार पीकविमा

Cyber Fraud Alert: सायबर फसवणुकीचा नवा प्रकार; काय आहे 401# कोड आणि त्याचे धोके, जाणून घ्या आणि आताच सावध व्हा!

Latest Marathi News Updates: हरिद्वारमध्ये बुडणाऱ्या कावडियांना एसडीआरएफच्या जवानांनी वाचविले

Python Enters House Video: भयानक! मोबाइल बघत बसली होती मुलं, तितक्यात घरात शिरला महाकाय अजगर अन् मग...

पार्किंगपासून ते दुकानाच्या भाड्यापर्यंत...; विमानतळावर सर्व महाग होणार, टीडीएसएटीच्या मोठ्या निर्णयानं टेन्शन वाढवलं

SCROLL FOR NEXT