national youth festival esakal
नाशिक

National Youth Festival : मोदींच्या सभेसाठी जर्मन तंत्रज्ञानावर आधारित डोम; राष्ट्रीय युवा संमेलन तयारी

राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्‍घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत असल्याने त्यासाठी जर्मन तंत्रज्ञानावर आधारित डोमचा उपयोग नाशिकमध्ये पहिल्यांदाच करण्यात येत आहे.

सकाळ वृत्तसेवा

National Youth Festival : राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्‍घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत असल्याने त्यासाठी जर्मन तंत्रज्ञानावर आधारित डोमचा उपयोग नाशिकमध्ये पहिल्यांदाच करण्यात येत आहे. तब्बल २०० फूट उंच आणि ८०० लांबीचा वॉटरप्रूफ मुख्य डोम उभारण्याचे काम अहोरात्र सुरू आहे.

विशेष म्हणजे संपूर्ण साउंड सिस्टिम ही नाशिकची राहणार आहे. ()

तपोवनातील मोदी मैदानावर शुक्रवारी (ता. १२) राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्‍घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होत आहे. तपोवनातील १८ एकर मैदानावर ५० हजार लोकांची व्यवस्था करण्यात येत आहे. या मैदानावर मंडप, साउंड सिस्टिम व आसनव्यवस्थेची कामे प्रगतिपथावर आहेत.

त्यासाठी तब्बल ७०० कामगार अहोरात्र मेहनत घेत आहेत. यापूर्वी भुजबळ नॉलेज सिटीमध्ये झालेल्या साहित्य संमेलनाच्या वेळी वापरात आलेल्या डोमची उंची ९० फूट होती, तर या डोमची उंची तब्बल २०० फूट आहे. गुरुवार (ता. ११)पर्यंत हे काम पूर्ण होईल.

मोदी मैदानाची वैशिष्ट्ये

- पन्नास हजार लोकांची आसनव्यवस्था

- दोनशे फूट उंच, ८०० फूट लांब जर्मन तंत्रज्ञानावर आधारित वॉटरप्रूफ डोम

- संपूर्ण साउंड सिस्टिमची व्यवस्था नाशिकची

- गुरुवारी (ता. ११) संपूर्ण तयारीचे काम होणार पूर्ण

- ४० बाय १०० फुटांचे मुख्य स्टेज

- मुख्य व्यासपीठावर निवडक व्यक्तींनाच प्रवेश

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Munde: ओबीसी मेळाव्यातून पंकजा मुंडे टार्गेट? गोपीनाथ मुंडेंचा वारसा धनंजय मुंडेंना देण्याची भाषा; भुजबळांच्या डोक्यात काय शिजतंय?

Cheque Clearing: दिवाळीपूर्वी बँकांमध्ये चेक क्लिअरिंग रखडले! व्यापाऱ्यांची चिंता वाढली; थेट पंतप्रधानांना लिहिलं, म्हणाले...

Latest Marathi News Live Update : विक्रम मोडणार! २६ लाख दिव्यांसह इतिहास रचणाऱ्या दीपोत्सवाची भव्य तयारी सुरू

ऐन दिवाळीत फटाके संपले म्हणून भाईजानने चक्क जाळले पैसे ; वडील सलीम खान यांनी केलं असं काही..

Crime News : रावेर पोलिसांची कामगिरी: मध्य प्रदेश, ओडिसा, राजस्थानमधून अपहरण झालेल्या ५ अल्पवयीन मुलींची सुटका!

SCROLL FOR NEXT