harin.jpg
harin.jpg 
नाशिक

धक्कादायक!...तर यासाठी झाली हरणाची शिकार; सूत्रधार मात्र फरार..अखेर झाला खुलासा

संतोष विंचू

नाशिक / येवला : डोंगरगाव येथे हरणांच्या शिकारीसाठी काही जण येणार असल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती. त्यानुसार वनपरिक्षेत्र अधिकारी संजय भंडारी व त्यांच्या सहकाऱ्यांनी दगडाने ठेचून मारलेल्या हरणासह एकास घटनास्थळीच पकडले होते. पण ती शिकार त्यांनी नेमकी कशासाठी केली याबाबत खुलासा झाला आहे.

असा घडला प्रकार

डोंगरगाव येथे हरणांच्या शिकारीसाठी काही जण येणार असल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती. त्यानुसार वनपरिक्षेत्र अधिकारी संजय भंडारी व त्यांच्या सहकाऱ्यांनी दगडाने ठेचून मारलेल्या हरणासह एकास घटनास्थळीच पकडले होते. मधुकर शिवाजी पवार (वय ३०, रा. बिलवणी, ता. वैजापूर) असे त्याचे नाव असून, त्याच्याडे कसून चौकशी केली असता इतरांचीही नावे पुढे आली. त्यानुसार सहाय्यक वनसंरक्षक सुजित नेवसे, वनपरिक्षेत्र अधिकारी  भंडारी तसेच, दक्षता पथकाचे वनपरिक्षेत्र अधिकारी बशीर शेख, वनपाल एम. बी. पवार, वनरक्षक प्रसाद पाटील, गोपाळ हरगावकर, वनसेवक विलास देशमुख, ज्ञानेश्‍वर वाघ, पी. आर. नागपुरे, नवनाथ बिन्नर, श्रीमती मंजुळकर, विलास देशमुख, सुनील बुरूख, अमोल शिरसाट, दादा मोहन, आप्पा वाघ, मच्छिंद्र राखडे आदींनी बिलवणी येथे जाऊन अन्य तिघांना ताब्यात घेतले. त्यात अनिल मोरे (वय २८), बाळू पवार (३१) व १६ वर्षांच्या मुलाचा समावेश आहे. या प्रकणात मुख्य सूत्रधार अद्याप फरारी आहे. बिलवणी येथे वनाधिकाऱ्यांना हरणाची शिंगे, कातडी, हाडे आदी अवयव सापडले. त्यामुळे यापूर्वीही शिकार झाल्याची शक्यता खरी ठरली आहे. प्राथमिक तपासात मांसाहार करण्यासाठी हरणांची शिकार केली जात असल्याची माहिती पुढे आली असून, सखोल तपास सुरू आहे. 

मांसाहार करण्यासाठीच हरणांची शिकार

गेल्या मंगळवारी (ता. ११) डोंगरगाव शिवारात हरणाची (काळवीट) शिकार करून पळून गेलेल्यांपैकी चौघांना वन विभागाने गुरुवारी (ता.१३) बिलवणी येथून ताब्यात घेतले. मात्र, या प्रकरणातील सूत्रधार अद्याप फरारी असून, मांसाहार करण्यासाठीच हरणांची शिकार होत असल्याची माहिती यानिमित्ताने पुढे आली आहे. 

एक हरीण जखमी... 
दरम्यान, रेंडाळे येथे गुरुवारी कुत्र्यांच्या हल्ल्यात हरीण गंभीर जखमी झाले आहे. त्याचा डाव्या बाजूचा पुढचा पाय निकामी झाला. येथील वन्यजीव संरक्षक समितीचे प्रवीण आहेर यांनी या काळविटाला राजापूर येथील कर्मचाऱ्याकडे दिले. त्याच्यावर उपचार करण्यात आले.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT