Donkey watered by police esakal
नाशिक

संत एकनाथांच्या आधुनिक भूमिकेत पोलिस

सागर आहेर

चांदोरी (जि. नाशिक) : एकीकडे दिवाळीच्या दिवशी नागरिकांची सायखेडा या गावात खरेदीसाठी गर्दी असतांना भर रस्त्यावर पाण्यासाठी व्याकूळ होत गलितगात्र झालेल्या गाढवास सायखेडा पोलिसांमधील सहाय्यक पोलिस निरीक्षक पी. आय. कादरी यांनी पाणी पाजत तृष्णातृप्ती केल्याने संत एकनाथांच्या आधुनिक भूमिकेत सायखेडा पोलिस असल्याचे अनेकांनी बघितले. पोलिसांनाही भूतदया असल्याची प्रचिती आल्याने उपस्थितांनी कौतुक केले.

सायखेडा शहरातील वर्दळीच्या पोलिस स्टेशन परिसरात रस्त्याच्या कडेला भर दुपारी उन्हात दोन गाढव निपचित पडल्याचे सहायक पोलिस निरीक्षक पी. वाय. कादरी यांना दिसले. त्यांनी त्यास तेथून हुसकावून लावण्याचे प्रयत्न केले. मात्र तृष्णेने व्याकूळ झालेल्या त्या दोन गाढवाने कुठलीही दाद न दिल्याने तेथे उपस्थित असलेल्या कादरी यांनी पोलिस हवालदार तेलोरे, किरण नाईक, नवनाथ नायकवाडी या पोलिस कर्मचाऱ्यांची भूतदया जागृत झाली. बाजूलाच असलेल्या पोलिस स्टेशनमधून पाणी व थोडी खाद्यसामग्री मागवण्यात आली. पोलिस कर्मचाऱ्यांनी पाणी देताच बराच वेळपासून निपचित पडलेल्या गाढवानी त्वरित पाणी पिऊन आपली तृष्णातृप्ती केली.

यामुळे तीव्र उन्हाने गलितगात्र झालेल्या गाढवास ऊर्जा आली आणि काय तर ते उठून बसले. रस्त्याने जाणाऱ्या अनेकांनी हा काय प्रकार आहे, याकरिता थांबून बघितले. गाढवास पाणी देणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांचे उपस्थितांनी कौतुक करीत इतिहासातील संत एकनाथांनी त्या काळी गाढवास पाणी दिल्याची घटना अनेकांनी बोलून दाखवीत सायखेडा पोलिस आधुनिक एकनाथ असल्याची पावती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नवी मुंबईत गोळीबाराचा थरार! इसम बाईकवरून आला, समोरच्या व्यक्तीवर गोळ्या झाडल्या अन्...; संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद

Ayodhya: अयोध्येत सापडला ३०० वर्ष जुना खजिना! हाताने लिहिलेली 'रामचरितमानस'ची दुर्मिळ प्रत समोर; सरकारने घेतला मोठा निर्णय

Maharashtra Weather: यंदाचा उन्हाळा ठरणार ‘विरोधाभासी’! उन्हाच्या कडक चटक्यांसह सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज, आरोग्याबरोबरच शेती क्षेत्रावरही संकट..

विराट कोहलीला धुरंधर चित्रपट पाहून काय वाटलं? स्पेशल पोस्ट करत म्हणाला, 'मी भारतात कधीच याआधी...'

खरातशी कनेक्शन; IAS सह DCP, ACP दर्जाच्या महिला अधिकारीही गोत्यात येण्याची शक्यता, आवडत्या पोस्टिंगसाठी...

SCROLL FOR NEXT