crime Kidnapped  esakal
नाशिक

Malegaon : मुले पळविणारी टोळी.....अभोणा पोलिस ठाण्यातर्फे आवाहन!

सकाळ वृत्तसेवा

अभोणा : येथील परिसरात सध्या मुले पळविणारी टोळी दाखल झाल्याचे मॅसेज व्हायरल होऊन नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. त्यात कुठलेही तथ्य नसून नागरिकांनी व पालकांनी अशा अफवांवर विश्‍वास ठेवू नये. संशयास्पद वाटत असेल तर ११२ क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन अभोण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन शिंदे यांनी केले आहे. (dont trust false message of child kidnapping gang police appeal to commoners malegaon news)

दोन दिवसांपासून लहान मुले पळविणारी टोळी परिसरात कार्यरत झाली असून, त्यांच्याकडून शालेय परिसरातून लहान मुलांचे अपहरण करून पळवून नेली जात असल्याच्या चर्चा किंवा मॅसेज निराधार आहेत. यात कोणतेही तथ्य नाही. या प्रकाराची शहानिशा केली असता असा कोणताही प्रकार परिसरात घडलेला नाही.

गैरसमज निर्माण होईल, असा कोणताही मॅसेज सोशल मीडियावर कोणीही व्हायरल करू नये. असा प्रकार करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई केली जाईल. तथ्यहीन मॅसेजमुळे एखाद्याच्या जीवनमरणाचा प्रश्‍न उद्‌भवू शकतो. कुणीही खोटे व बनावट मॅसेज, अफवा पसरवू नयेत. कुठेही संशयास्पद व्यक्ती वा समूह आढळल्यास तत्काळ ११२ नंबरवर संपर्क करावा.

कुणीही मारहाण करू नये. कायद्याचे उल्लंघन करू नये. चुकीचे व दिशाभूल करणारे मॅसेज व्हायरल करून समाजात भीती व धोका निर्माण करणाऱ्या नागरिकांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. अशा चुकीच्या मॅसेजमुळे एखाद्या निष्पाप नागरिकाचा झुंडबळीत मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे मारहाण करणाऱ्यांची ओळख निष्पन्न करून गंभीर गुन्हा दाखल होऊ शकतो, असेही श्री. शिंदे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT