zp nashik.jpg
zp nashik.jpg 
नाशिक

जिल्हा परिषदेत एकाच कामाची चक्क दोनदा बिले? काय आहे भानगड...

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : वरसविहीर ते बोरीपाडा या त्र्यंबकेश्‍वर तालुक्‍यातील रस्त्याच्या एकाच कामाचे बिल दोन वेळेस काढून फसवणूक केल्याप्रकरणी अहवाल प्राप्त होऊनही दोषी ठेकेदारांवर कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी शनिवारी (ता. 15) आक्रमक पवित्रा घेतला. या प्रकरणातील ठेकेदार दोषी असताना वाचविले जात असून, बांधकाम विभाग संबंधितांची पाठराखण करत असल्याचा आरोप सदस्यांनी केला. एवढेच नव्हे, तर सभागृहात उभे राहून सभात्याग करण्याचा पवित्रा घेतला. मात्र या विषयावर कायदेशीर सल्ला घेऊन कारवाईचे आश्‍वासन प्रशासनाकडून देण्यात आले. त्यानंतर सभागृहाने दोषी ठेकेदारांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून काढण्यात आलेले बिल वसूल करावे, असा ठराव या वेळी झाला. 

फसवणुकीवरून सदस्य आक्रमक; स्थायी समितीची बैठक 

जिल्हा परिषदेची स्थायी समिती सभा शनिवारी अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी सभा पार पडली. सुरवातीलाच सदस्य शंकर धनवटे यांनी त्र्यंबकेश्‍वर तालुक्‍यातील वरसविहीर ते बोरीपाडा रस्त्याच्या एकाच कामाची दोन बिले काढून फसवणूक केल्याप्रकरणी संबंधित ठेकेदारांवर काय कारवाई केली, असा प्रश्‍न उपस्थित केला. यावर संबंधित प्रकरणाचा अहवाल प्राप्त झाला असून, त्याआधारे अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली. मात्र ठेकेदारांवर कारवाई का होत नाही, असा संतप्त सवाल डॉ. आत्माराम कुंभार्डे यांनी उपस्थित केला. केवळ काळ्या यादीत टाकून ठेकेदारांची पाठराखण केली जात असल्याचा आरोपही त्यांनी या वेळी केला. संबंधित ठेकेदाराला कार्यालयात कार्यकारी अभियंते शेजारी बसून घेत कामकाज करतात, सदस्यांना मात्र उभे ठेवत असल्याची बाब धनवटे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणली. त्यावर संतप्त झालेल्या सदस्यांनी ठेकेदाराला बसायला जागा आहे अन्‌ लोकप्रतिनिधींना जागा नाही. त्यामुळे यापुढे ठेकेदाराला घेऊनच काम करा, असे सुनावले. यावर कार्यकारी अभियंता गांगुर्डे यांनी संबंधित संस्थेला काळ्या यादीत टाकले आहे, मात्र ठेकेदार या प्रकरणात प्रत्यक्षात दोषी दिसून येत नसल्याचा खुलासा केला. या वेळी संबंधित ठेकेदार दोषी असूनही त्यास वाचविले जात असल्याचा आरोप सदस्यांनी केला.

कारवाई करण्यासाठी कोणते पाऊल उचलणार

उपाध्यक्ष डॉ. सयाजी गायकवाड यांनी ठेकेदारांवर कारवाई करण्याबाबत कारवाई करण्यासाठी कोणते पाऊल उचलणार, अशी विचारणा केल्यावर याबाबत कायदेशीर सल्ला घ्यावा लागेल, असे गांगुर्डे यांनी सांगितले. कायदेशीर सल्ला घ्याच, परंतु त्या ठेकेदारांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्यांच्याकडून वसुली करावी, असा ठराव या वेळी करण्यात आला. या चर्चेत महेंद्र काले, सविता पवार, छाया गोतरणे, भास्कर गावित यांनी सहभाग घेतला. बैठकीस उपाध्यक्ष डॉ. गायकवाड, सभापती सुरेखा दराडे, अश्‍विनी आहेर, सुशीला मेंगाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, उज्ज्वला बावके आदी उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salman Khan: सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरण! एका आरोपीचा पोलीस कोठडीत आत्महत्येचा प्रयत्न, प्रकृती गंभीर

Monsoon Season : यंदा 'मॉन्सून' लवकरच हजेरी लावणार; हवामानतज्ज्ञांचा अंदाज, उष्णतेमुळे पाण्याचे बाष्पीभवन वेगाने

Changpeng Zhao: बिनन्सच्या संस्थापकाला तुरुंगवास; जगातील सर्वात श्रीमंत क्रिप्टो एक्सचेंजमध्ये नेमकं काय झालं?

नाशिकचा सस्पेन्स संपला ! हेमंत गोडसे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर, शांतिगिरी महाराजांना धक्का

Latest Marathi News Live Update: मनेका गांधींनी भरला उमेदवारी अर्ज

SCROLL FOR NEXT