Sport Scholarship 
नाशिक

Nashik News: खेळाडूंसाठी खुशखबर! शहरातील खेळाडूंच्या शिष्यवृत्तीत दुप्पट वाढ; महासभेवर प्रस्ताव

सकाळ वृत्तसेवा

Sport Scholarship : शहरातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने महापालिकेकडून आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये प्रावीण्य मिळविणाऱ्या खेळाडूंच्या क्रीडा शिष्यवृत्तीत दुप्पटीने वाढ करण्यात आली आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या खेळाडूला दोन लाख रुपये, राष्ट्रीयस्तरावर ५० हजार, तर राज्यस्तरावरील खेळाडूला २० हजार रुपये वार्षिक शिष्यवृत्ती मिळणार आहे. महासभेवर प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. (Doubling of scholarships for city players nashik news)

महापालिकेच्या माध्यमातून क्रीडा धोरण राबविले जाते. त्यासाठी अंदाजपत्रकात पाच टक्के निधी राखीव ठेवला जातो. महापालिका हद्दीतील ज्या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्यस्तरावरील स्पर्धांमध्ये प्रावीण्य मिळवून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे विजेतेपद पटकाविले आहे, अशा खेळाडूंना क्रीडा शिष्यवृत्ती या धोरणांतर्गत दिली जाते.

आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या खेळाडूंना एक लाख, द्वितीय क्रमांकास ७५ हजार, तर तृतीय क्रमांक पटकाविणाऱ्या ५० हजार रुपये, राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्यास २५ हजार, द्वितीय १५ हजार तर तृतीय १० हजार, राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक येणाऱ्यास सात हजार, द्वितीय पाच हजार तर तृतीय क्रमांक पटकाविणाऱ्या खेळाडूस तीन हजार रुपये वार्षिक शिष्यवृत्तीच्या दिली जाते.

शिष्यवृत्तीत वाढ करण्याच्या मागणीनुसार महासभेवर प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत प्रथम येणाऱ्या खेळा़डूला दोन लाख, द्वितीय- दीड लाख, तृतीय- एक लाख, राष्ट्रीय स्पर्धेत प्रथम येणाऱ्यास ५० हजार.

द्वितीय- ३० हजार तर तृतीय- २५ हजार, राज्यस्तरावरील स्पर्धेत प्रथम येणाऱ्यास २० हजार, द्वितीय- १० हजार तर तृतीय क्रमांक पटकाविणाऱ्या ८ हजार रुपयांची वार्षिक शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.

शिष्यवृत्तीसाठी अटी व शर्ती

- खेळास भारतीय ऑलिंपिक, पॅरा ऑलिंपिक संघटनेची मान्यता बंधनकारक.

- खेळाडूची शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाकडे नोंदणी आवश्यक.

- खेळाचे आयोजन करणारी संघटना मान्यताप्राप्त असावी.

- वर्षात एकाच स्पर्धेतील यशासाठी शिष्यवृत्ती घेता येणार.

- शिष्यवृत्तीसाठी विहित नमुन्यात अर्ज सादर करणे बंधनकारक.

- शिष्यवृत्ती नाशिक महापालिका कार्यक्षेत्रातील खेळाडूंसाठीच.

- स्पर्धेतील विजयाच्या एक वर्षाच्या आत अर्ज करणे बंधनकारक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

Latest Marathi News Live Update : कोकणातही दुष्काळाची परिस्थिती; भातपिकाला मोठा फटका

TVK West Bengal Expansion : तमिळनाडूनंतर आता 'या' राज्यातही विजय यांच्या 'टीव्हीके'ची एन्ट्री? पक्ष कार्यालय उद्घाटनानंतर राजकीय चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT