Dowry
Dowry esakal
नाशिक

Nashik : आता वधू संशोधनासाठीही दमछाक!; वराला द्यावा लागणारा हुंडा आता वधुसाठीही!

मोठाभाऊ पगार

देवळा (जि. नाशिक) : वरसंशोधनासाठी वधूपित्यांची धावपळ समाजाने पहिली आहे आणि अनुभवलेलीही आहे. परंतु, अलीकडे मुलांच्या तुलनेत मुलींचे प्रमाण कमी झाल्याने उपवर वधुसाठी नवरदेवाकडील मंडळींना वधुसंशोधन करावे लागत आहे. एवढेच काय तर आता वधू मिळावी, यासाठी वराच्या कुटुंबियांना आर्थिक स्वरूपात हुंडा द्यावा लागत असल्याचे चित्र आहे.
मागील दशकात आणि त्यापूर्वीही मुलीला चांगला वर मिळावा, यासाठी वरपित्याच्या घराचे उंबरठे झिजवून वधूपिता मेटाकुटीला येत असे. वराकडील सर्व मागण्या पूर्ण करण्याबरोबरच रोख रकमेसह सोने व वस्तूंच्या रुपात हुंडा दिला जात असे.

काहीवेळा तर हा जणूकाही व्यवहार चालू आहे की काय, अशी शंका यायची. याबाबत काही नाराजी झाल्यास लग्न मोडणे, मुलीला त्रास देणे अशा बाबी पुढे यायच्या. समाजातील या अनिष्ट रुढींवर नाटके, सिनेमे सुद्धा निघाले होते. लेकीचं लग्न म्हणजे जिवाला घोर त्यामुळेच लेक नको म्हणून स्त्रीभ्रूण हत्येचा कलंक समाजाने लावून घेतला. यातून वर्षागणिक मुलींचे प्रमाण कमीकमी होत गेले आणि त्याचे दृश्य परिणाम आता स्पष्टपणे दिसू लागले आहेत. (dowry to be paid by groom now also for bride Nashik Latest Marathi News)

आताही अशी हुंड्याची प्रथा काही प्रमाणात चालू असली तरी पूर्वीच्या मानाने हुंडा इतकाच हवा असा आग्रह नसतो. आणि ग्रामीण भागात म्हणाल तर आता उलट चित्र निर्माण झाले आहे. उपवर वधू मिळत नसल्याने मुलीकडील मंडळीला आम्ही पैसे म्हणजे (आपण त्यालाही आता हुंडाच म्हणूया) हुंडा देण्याची वेळ वराच्या पालकांवर आली आहे. समाजाने ही बदललेली कूस मुलींच्या जीवनाला झळाळी देणारी असली तरी सामाजिक विषमता दर्शवणारी पण आहे.

दर हजारी पुरुषांमागे स्त्रियांची संख्या नऊशेच्या आसपास आहे. याचे दृश्य परिणाम आता दिसू लागल्याने बहुतांश वर हळद लागण्यापासून वंचित राहत आहेत. गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असलेले हे उतावळे नवरे व त्यांचे कुटुंबीय ‘यंदा कर्तव्य आहे’ म्हणून ‘एखादी चांगली मुलगी पहा हो’ असा सूर आळवत आहेत. वधू- वर संशोधन केंद्रातही आता ‘वधू पाहिजे’ साठी नवरदेवांची नोंदणी वाढली असल्याचे पाहावयास मिळत आहे. आपल्या भागात विविध जाती- धर्माचे आणि पंथाचे लोक राहतात. रोटी- बेटी व्यवहार हा आधी त्यात्या समाजापुरताच मर्यादित होता.

परंतु, आता उपवर आणि सुस्वरूप मुलगी असल्यास आर्थिक घडामोडी घडवून आणत अर्थात हुंडा देत आणि या जातीपातीच्या भिंती सरकवत विवाह जमवण्यासाठी प्रयत्न केले जातात. पूर्वी जवळपास सोयरीक असावी, असा आग्रह असायचा आता अंतराचा प्रश्‍नही गौण समजला जात आहे. लग्नाची मुलगी मिळावी, यासाठी वराकडील मंडळी रोख रक्कम देण्यासोबत लग्नाचा तसेच पंगतीचा खर्च करण्यास तयार असते. याबदल्यात मुलीव्यतिरिक्त इतर कोणतीच मागणी नसते. मुलीला सासूचा जाच, छळ या गोष्टीही यामुळे बाजूला पडल्या आहेत.

"आता मुलींच्या शिक्षणात प्रगती झाली आहे. यामुळे त्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. उच्चशिक्षित, निर्व्यसनी, घरंदाज, कर्ता वर मिळावा अशी त्यांची इच्छा असते. यामुळे शेतकरी, शेतमजूर वरांची कुचंबणा होत असल्याचे चित्र आहे. यामुळे मुलांनी कोणत्याही परिस्थितीत शिक्षण- नोकरी-व्यवसायात स्वतःला सिद्ध करावेच लागणार आहे."

- हिरामण पवार, गटप्रमुख, कसमादे वधू- वर व्हॉट्सॲप ग्रुप

"‘कोनं काढीवं हुंडानी चाल- पोरीवालासना शेतस हाल’ अशी गाणी पूर्वी लग्नात कानावर पडायची. परंतु ‘आता बदलनी हुंडानी चाल- पोऱ्यावालासना शेतस हाल’ असे नवे गाणे रूढ झाले तर नवल वाटायला नको." - दीपक भदाणे, खिरमाणी (ता. बागलाण)

"अलीकडच्या काळात शेतीला प्रतिष्ठा मिळवून देण्याची गरज आहे. आताचे युवा शेतकरी नोकरीवाल्या पेक्षा जास्त उत्पादन घेतो. मात्र तरीसुद्धा तो दुर्लक्षित राहतो, हे खेदजनक आहे. यासाठी शेतीला उद्योगाचा दर्जा मिळायला हवा, इतर उद्योगांना मिळतात तशा सवलती शेतकऱ्यांना मिळायला हव्यात आणि यासाठी राज्यकर्त्यांनी शेतीकडे प्राधान्याने लक्ष केंद्रित केले पाहिजे. कारण इतर कुठल्याही उद्योगांपेक्षा शेती ही शाश्‍वत आहे. परंतु, दुर्लक्षित आहे."
- प्रा. यशवंत गोसावी, शिवव्याख्याते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Datta Bharane: 'तो कार्यकर्ता नव्हता, तर...'; शिवीगाळाच्या व्हिडिओवर दत्ता भरणे यांनी दिलं स्पष्टीकरण

ठाकरे गट विरुद्ध शिंदे गटात राडा, हातकणंगलेत मतदान केंद्रावर कार्यकर्ते भिडले! नेमकं काय घडलं?

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सांगोल्यात दोन गटांमध्ये हाणामारी, शेकाप कार्यकर्ते अन् शिवसैनिक भिडले

Latest Marathi News Live Update: मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ

Kanhaiya Kumar: कन्हैया कुमार यांच्याकडे एवढी आहे संपत्ती; दिल्लीच्या उमेदवारांमध्ये मनोज तिवारी सर्वात श्रीमंत

SCROLL FOR NEXT