Nashik Neo Metro project News esakal
नाशिक

Nashik Metro Project : नाशिक मेट्रो निओचा DPR पंतप्रधान कार्यालयाकडे सादर

मेट्रो निओचा गेल्या दोन वर्षांपासून रखडलेला प्रकल्प मार्गी लागण्याची चिन्हे दिसू लागली आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : मेट्रो निओचा गेल्या दोन वर्षांपासून रखडलेला प्रकल्प मार्गी लागण्याची चिन्हे दिसू लागली आहे. महा मेट्रोकडून सविस्तर प्रकल्प आराखड्याचे सादरीकरण केल्यानंतर पंतप्रधान कार्यालयाकडे हा आराखडा सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला. (DPR of Nashik Metro Neo submitted to Prime Ministers Office nashik news)

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

देशातील पहिला टायर बेस मेट्रो निओ प्रकल्प नाशिकमध्ये साकारला जाणार आहे. मागील दोन वर्षांपासून केंद्रीय मंत्रिमंडळाकडे मंजुरीअभावी प्रस्ताव पडून आहे. या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढील दोन ते तीन महिन्यात मेट्रोचे काम सुरू होईल अशी घोषणा नाशिकमध्ये केली होती.

नाशिकमधून मुंबईत परतताच दिल्लीमधून मेट्रो निओचे सादरीकरण करण्याच्या सूचना नाशिक महापालिकेला आल्या. त्या अनुषंगाने महापालिकेचे आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आज दिल्लीत सादरीकरण केले.

महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश मिश्रा, संचालक सुनील माथुर यांच्यासमोर मेट्रोचे सादरीकरण केले. सविस्तर प्रकल्प आराखडा केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर सादर केला जाणार आहे. मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर कामाला सुरुवात होईल अशी माहिती सूत्रांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpatipule Tourism Latest Update : गणपतीपुळे बीच अखेर पर्यटकांसाठी खुला! 2 महिन्यांनंतर बंदी उठवली; पर्यटकांमध्ये आनंदाचं वातावरण

थकलेला चेहरा, चालताही येईना... नवऱ्याला अखेरचा निरोप देताना अरुणा इराणी यांना अश्रू अनावर; या कलाकारांचीही हजेरी

Marathi News: मराठी डिजिटल न्यूजमध्ये eSakal पुन्हा नंबर 1; Comscoreच्या ताज्या आकडेवारीत 7.4 कोटींचा टप्पा

Latest Marathi News Live Update : करमाडमध्ये टोमॅटो दरावरून शेतकऱ्यांचा उद्रेक

Chandgad MD Drugs Case: चंदगड पोलिस, पालकांची जबाबदारी वाढली; हाजगोळी ड्रग्ज प्रकरण; मुलांच्या वर्तणुकीकडे लक्ष ठेवण्याची गरज

SCROLL FOR NEXT