Procession file photo esakal
नाशिक

Dr. Ambedkar Jayanti : मिरवणुकीवर ड्रोनची निगराणी; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

सकाळ वृत्तसेवा

Dr. Ambedkar Jayanti : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती शुक्रवारी (ता. १४) शहरभर उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. यानिमित्ताने मुख्य मिरवणुकीसह नाशिक रोड येथे मिरवणूक तर, पाथर्डी फाटा येथे कार्यक्रमाचे नियोजन आहे.

या जयंती उत्सवात कोणताही अनुचित प्रकार वा गालबोट लागू नये, यासाठी शहर पोलिस अलर्ट आहेत. खबरदारी म्हणून जयंती मिरवणुकीवर ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार आहे.

तसेच, मिरवणूक मार्गावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे पोलिसांची नजर असणार आहे. कडेकोट पोलिस बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आलेले आहे. (Dr Ambedkar Jayanti Drone surveillance on procession Strict police presence nashik news)

जुने नाशिकमधील राजवाडा येथून मुख्य मिरवणूक दरवर्षी निघते. यासाठी पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या आदेशान्वये कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. मुख्य मिरवणूक मार्गावर पोलिसांच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर असणार आहे.

तसेच, मिरवणुकीवर यंदा ड्रोन कॅमेऱ्याचीही करडी नजर ठेवली जाणार असल्याची माहिती परिमंडळ एकचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी दिली. जुने नाशिक, नाशिक रोड व पाथर्डी येथे साजरी होणाऱ्या जयंतीसाठी तब्बल अडीच हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.

यासह स्थानिक पोलिस ठाणे, गुन्हे शाखा, विशेष गोपनीय शाखेसह राज्य राखीव पोलिस बलाच्या दोन तुकड्या, दंगल नियंत्रण पथक (आरसीपी), क्यूआरटी असे सर्व पथके तैनात राहणार आहेत. परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, परिमंडळ दोनचे उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी बंदोबस्ताचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

असे असेल बंदोबस्त

पोलिस आयुक्त : १
उपायुक्त : ३
सहायक आयुक्त : ८
पोलिस निरीक्षक : ३० पेक्षा अधिक
पोलिस अधिकारी : ३०० पेक्षा अधिक
होमगार्ड : ३००
अंमलदार : दोन हजार

"डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयुक्तालय हद्दीमध्ये कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात असेल. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांची सीसीटीव्हीद्वारे नजर असेल. जादा कुमकही सज्ज असेल.'- प्रशांत बच्छाव, पोलिस उपायुक्त, गुन्हेशाखा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur News: '१५ दिवसांत केला प्रलंबित १७ हजार दाखल्यांचा निपटारा'; जन्म-मृत्यू विभागात कर्मचारी वाढवून, सुट्या रद्द करून कामात आणली गती

Pune Police : विद्यार्थ्यांमधील गुन्हेगारी रोखण्यासाठी पुणे पोलिसांचा शिक्षण संस्थांबरोबर विशेष उपक्रम

Latest Marathi News Update LIVE : थार आणि कारचा भीषण अपघात, ५०० फूट खोल दरीत कार कोसळली, ६ पैकी ४ जणांचे मृतदेह सापडले, २ अजूनही बेपत्ता

Heart Blockage: हार्ट ब्लॉकेज कमी करतात ‘या’ 3 भाज्या, डॉक्टरही देतात रोज खाण्याचा सल्ला

kolhapur kagal politics: मुश्रीफ -राजे गट एकत्र आल्यानंतर, मंडलिकांनी वेगळी चाल खेळली; संजय घाटगेंची भेट घेत केली बंद खोलीत चर्चा

SCROLL FOR NEXT