Ambedkar Jayanti 2023 file photo
Ambedkar Jayanti 2023 file photo esakal
नाशिक

Dr. Ambedkar Jayanti : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती जल्लोषात; फटाक्यांची आतषबाजी अन् सवाद्यात मिरवणुका

सकाळ वृत्तसेवा

Dr. Ambedkar Jayanti : युगपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती शहर व परिसरात विविध प्रबोधनात्मक, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून आकर्षक चित्ररथ देखावे, विद्युतरोषणाई, फटाक्यांची आतषबाजी, वाद्यांच्या मिरवणुकीत मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली.

सर्वत्र निळेध्वज, पताका, शुभेच्छा फलक यामुळे शहर निळे भीममय झाले होते. पूर्वसंध्येला पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी हजारोंच्या संख्येने अनुयायी उपस्थित होते. विशेष म्हणजे चित्ररथ देखाव्यात विविध समस्या, ज्वलंत प्रश्नांवर भाष्य करण्यात आले. (Dr Babasaheb Ambedkar Jayanti celebrations Fireworks display and processions in Savada nashik news)

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीची तयारी शहरात महिनाभरापासूनच सुरवात करण्यात आली होती. विशेष म्हणजे यावर्षी देखील भीमोत्सव आयोजन समितीतर्फे शाहिरी जलसा, आंबेडकरी जलसा, व्याख्यान, नाट्यप्रयोग आदी भरगच्च प्रबोधनात्मक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

भीमोत्सव आयोजन समितीतर्फे जयंतीच्या पूर्वसंध्येला बाबासाहेबांच्या पुतळ्याला भीमोत्सव समितीचे प्रमुख राजेंद्र पगारे, दिनकर धिवर, अनिल निरभवणे, अमोल खरे, नीलेश वाघ, संजय कटारे, प्रा. डॉ. जे. वाय. इंगळे आदींनी अभिवादन केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीतर्फे बाबासाहेबांच्या पुतळ्यास रिपाइं जिल्हाध्यक्ष राजेंद्र आहिरे, समितीचे अध्यक्ष आकाश वाघमारे, जिल्हा कार्याध्यक्ष गंगादादा त्रिभुवन, एड सुधाकर मोरे, दिलीप नरवडे, सचिन दराडे आदींनी हार अर्पण करून अभिवादन केले.

सार्वजनिक समितीतर्फे सायंकाळी शहरातील विविध भागातून निघणाऱ्या चित्ररथाचे डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळ भव्य स्टेज उभारून स्वागत करून मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष गणेश धात्रक, उपजिल्हा प्रमुख संतोष बळीद, माजी आमदार राजेंद्र देशमुख, सहसंपर्कप्रमुख प्रवीण नाईक, शहरप्रमुख माधव शेलार, संजय कटारिया, दिनेश केकान, यांनी पुतळ्यास हार घालून महामानवाला जयंती निमित्त अभिवादन केले.

आमदार सुहास कांदे यांच्यासह शहरप्रमुख मयूर बोरसे, तालुकाप्रमुख साईनाथ गिडगे, यांनी पुतळ्यास पुष्पहार घालून महामानवाला जयंती निमित्त अभिवादन केले. माजी आमदार पंकज भुजबळ, शहराध्यक्ष दीपक गोगड, राजेंद्र जाधव, प्रकाश बोदक, आनंद बोथरा, अक्षय देशमुख, यांनी पुतळ्यास हार घालून महामानवाला जयंती निमित्त अभिवादन केले.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

भाजपतर्फे जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे, शहराध्यक्ष जयकुमार फुलवाणी, नारायण पवार, शहर उपाध्यक्ष संदीप नरवडे, कांतिलाल लुणवत, एकनाथ बोडखे यांनी पुतळ्यास हार घालून महामानवाला जयंती निमित्त अभिवादन केले.

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित काँग्रेस भवनात अॅड. भरत होरसील, चेतन जाधव, सिद्धार्थ संसारे यांचे हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हार अर्पण करण्यात आले. यावेळी बाळासाहेब साळुंके, शंकरराव बोडके, अनिल जाधव, समाधान गोसावी, बाळू भंडागे, सचिन सानप आदी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

विविध पक्ष तसेच ऑल इंडिया एससी, एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड नगर पालिकेतील सिटू कामगार संघटना तर्फे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

चित्ररथातून सामाजिक संदेश

सायंकाळी शहरातील विविध भागातून मोठ्या संख्येने उत्कृष्ट सजावट असलेले चित्ररथ काढण्यात आले. डॉ आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मनमाड शहरातील भीमजयंती राज्यभर प्रसिद्ध आहे.

यंदा शिक्षण, डॉ आंबेडकरांनी देशहितासाठी केलेले कामे उदा, जलनीती, नदी जोड प्रकल्प, बांधलेले धरणे, वीज महामंडळ, रिझर्व्ह बँक, शेती, जमीन विषयक विचार, स्त्रीभ्रृण हत्या, सामाजिक प्रश्न, राजकीय भाष्य, डॉ आंबेडकरांविषयी विविध विषय तसेच त्यांच्या जीवनावरील विषय या चित्ररथातून मांडण्यात आले होते.

चाळीसच्या चित्ररथ यावेळी सहभागी झाले होते. शहरात विविध पक्ष, संघटनांकडून सरबत, पाणी, चहा, अन्नदान वाटप करण्यात आले.

पोलिस प्रशासनातर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी समरसिंग साळवे, पोलिस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली शहरात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: मुंबईकरांना IMD चा इशारा! पुढील 3 ते 4 तासांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, काळजी घेण्याचा सल्ला

Video: हिंदू-मुस्लीम ज्या दिवशी करेन, त्या दिवशी...; 'जास्त मुलांच्या' वक्तव्यावर PM मोदींनी दिलं स्पष्टीकरण

Gautam Gambhir: हार्दिकच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या डिविलियर्सवर भडकला गंभीर; म्हणाला, 'त्यांच्या कारकि‍र्दीत...'

Modi Road Show: PM मोदींचा उद्या घाटकोपरमध्ये 'रोड शो'; वाहतुकीत 'असे' असतील बदल

IPL 2024 DC vs LSG Live Score: पहिल्याच ओव्हरमध्ये दिल्लीला तगडा धक्का! धोकादायक फ्रेझर-मॅकगर्क भोपळाही न फोडता झाला आऊट

SCROLL FOR NEXT