Dr. Bharati Pawar latest marathi news
Dr. Bharati Pawar latest marathi news esakal
नाशिक

Dr. Bharati Pawar : थॅलेसेमियाच्या उपचारासाठी 10 लाखांची मदत मिळणार ; डॉ. भारती पवार

सकाळ वृत्तसेवा

Dr. Bharati Pawar : थॅलेसेमिया हा रक्ताशी संबंधित आनुवंशिक आजार आहे. या आजाराच्या उपचारासाठी रुग्णांना केंद्र सरकारकडून १० लाख रुपयांपर्यंतची मदत दिली जाणार आहे.

मुंबईतील दोन रुग्णालयांसह देशातील एकूण १० रुग्णालयांमध्ये ही सुविधा मिळणार आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिली. (Dr Bharati Pawar statement 10 lakhs will provided for treatment of thalassemia central government scheme nashik news)

उपक्रमांतर्गत सूचीबद्ध केलेल्या रुग्णालयांमध्ये मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालय आणि बृहन्मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांचा समावेश आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे सहकार्य लाभले, असे सांगून डॉ. पवार म्हणाल्या, थॅलेसेमियामुळे शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण सामान्य पातळीपेक्षा कमी होते.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत २०१७ पासून थॅलेसेमिया बाल सेवा योजना राबवली जाते. मार्चमध्ये योजनेचा दुसरा टप्पा पूर्ण झाला. कोल इंडियातर्फे त्यांच्या सीएसआर उपक्रमातंर्गतच्या वित्तीय सहकार्याच्या माध्यमातून हेमॅटोपॉएसीस स्टेम सेल ट्रान्सप्लांट हा उपक्रम राबवला जात आहे.

उपक्रमांतर्गत वंचित घटकांमधील थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांना, ज्यांच्याकडे वैद्यकीय स्थितीनुसार प्रत्यारोपणासाठी जुळणारे दाते आहेत, परंतु, या प्रक्रियेचा खर्च भागवण्यासाठी आर्थिक क्षमता अथवा स्रोत नाही, अशा रुग्णांना या आजारातून मुक्त होण्यासाठी एकदा करायच्या उपचारांची संधी उपलब्ध होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

आतापर्यंत दोन टप्प्यांमध्ये देशातील १० सूचीबद्ध रुग्णालयांमध्ये ३५६ थॅलेसेमिया रूग्णांवरच्या अस्थिमज्जा प्रत्यारोपण यशस्वी पूर्ण झाले.

तसेच, थॅलेसेमिया आणि सिकलसेलसारख्या रक्तविकारांचा सामना करण्यासाठी आजाराशी संबंधित तपासणी आणि चाचण्या वाढवणे, आजारासंबंधी अधिक जनजागृती करणे, समुपदेशनाच्या अधिक संधी उपलब्ध करून देणे आणि उपचारांच्या सोयी-सुविधा वाढविणे गरजेचे आहे.

त्याचबरोबर रक्ताशी संबंधित विकारांविरुद्धचा लढा बळकट करण्यासाठी समाजातल्या विविध भागधारकांनी पुढाकार घेऊन सहकार्य आणि मदतीचा हात पुढे करायला हवा, असेही डॉ. पवार यांनी सांगितले.

डॉ. पवार म्हणाल्या, की जागतिक थॅलेसेमिया दिनानिमित्त आरोग्य मंत्रालयाच्या थॅलेसेमिया बाल सेवा योजनेच्या तिसऱ्या टप्प्याचा आज प्रारंभ झाला. त्याअंतर्गत कोल इंडियाच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी उपक्रमांतर्गत राबवला जात आहे. थॅलेसेमिया बाल सेवा योजना पोर्टलही सुरू करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel Hamas War : रमजानमध्ये संदेशवाहक पाठवून युद्ध थांबले, इस्राईल-हमास युद्धावर पंतप्रधान मोदींचं मोठं वक्तव्य

Latest Marathi News Live Update : उद्या जर बिभव स्वतः आले नाहीत तर...स्वाती मालीवाल प्रकरणात महिला आयोग आक्रमक!

खासदारांच्या दिलदार मित्रानेच चंद्रहार पाटलांचा बळी दिला; विशाल पाटलांनी कोणावर केला गंभीर आरोप

Dry Day: मायानगरीचा विकेंड कोरडाच! मुंबई आणि परिसरात 3 दिवस ड्राय डे, काय आहे कारण?

नळातून किंवा शॉवरमधून पाणी येत नसेल तर घरच्या घरी 'असे' करा दुरुस्त

SCROLL FOR NEXT