Dr Bharti Pawar esakal
नाशिक

Dr. Bharati Pawar: निर्यातशुल्काचा फेरविचार करण्याबाबत पत्र लिहिणार : डॉ. भारती पवार

सकाळ वृत्तसेवा

Dr. Bharati Pawar : कांदा निर्यातीवर केंद्र सरकारने ४० टक्के शुल्क लागू केल्यावर त्याचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटल्याने केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी या निर्णयाचा फेरविचार करावा, यासाठी केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांना पत्र लिहिणार असल्याचे म्हटले आहे. (Dr Bharati Pawar statement Will write letter regarding revision of export duty nashik)

कांदा निर्यातीवर कुठल्याही प्रकारची बंदी नसून, देशांतर्गत कांद्याची मागणी लक्षात घेऊन केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. कांद्याच्या उत्पादनावर झालेला परिणाम आणि देशातील इतर राज्यांकडून कांद्याची होणारी मागणी विचारात घेता निर्यातीवर ४० टक्के शुल्क लागू केले.

त्यामुळे कांद्याची निर्यात कमी होईल आणि भाव नियंत्रणात येतील, असा अंदाज वर्तविला जातो. कांद्याचे भाव कमी होतील, या भीतीने शेतकऱ्यांनी रविवारी (ता. २०) ठिकठिकाणी केंद्र सरकारविरोधात तीव्र निदर्शने केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

केंद्र सरकारला शेतकरी व सर्वसामान्य जनता असा दोन्ही बाजूंनी विचार करावा लागतो. देशांतर्गत जनतेची मागणी लक्षात घेऊन त्या प्रमाणात पुरवठा झाला पाहिजे, म्हणून निर्यातीवर ४० टक्के शुल्क लागू केले.

२०१९ पासून निर्यात खुली करण्यात आलेली होती. त्यावर कुठल्याही प्रकारचे शुल्क नव्हते. आताही निर्यातीवर बंदी नाही. परंतु, निर्यात शुल्क हटविण्यासाठी केंद्रीय वाणिज्यमंत्री गोयल यांना पत्र लिहिणार असल्याचे मंत्री डॉ. पवार यांनी सांगितले.

दरम्यान, ‘नाफेड’ने ५०० कोटी रुपयांचा कांदा खरेदी केला असून, गरज पडल्यास अजून कांदा खरेदी केला जाईल, असेही मंत्री डॉ. पवार म्हणाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा Ee Sala Cup Namde! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फायनलमध्ये दिमाखात प्रवेश; गुजरात टायटन्सचा लाजीरवाणा पराभव

BJP Government: भाजप सरकार देणार पाच रुपयांमध्ये मासे-भात भोजन; महिलांसाठी अन्नपूर्णा योजनेची घोषणा

Sholay Style Agitation : पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाइलने आंदोलन; जलजीवन योजनेचे पाणी घरापर्यंत पोहोचत नसल्याने केला निषेध

Ambad Rajasthani Women: अंबडमध्ये राजस्थानी महिला मंडळाचा ‘धोंडा रो आगमन’ सोहळा; दीडशे लेकींचा पारंपरिक धोंडे जेवण, आहेर व भेटवस्तूंनी सन्मान

Sakoli Murder Case: गडकुंभली तलाव हत्याकांड उघड: निखिल कांबळे खूनप्रकरणी आरोपी जेरबंद, तलावातून धारदार चाकू व दगड जप्त

SCROLL FOR NEXT